Post Office पेक्षा जबरदस्त परतावा देणारी LIC ची योजना, दररोज 45 रुपये जमा केल्यास मिळणार 25 लाख रुपये ! कोणती आहे ही योजना ?

LIC New Saving Scheme : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी गुंतवणूक वाढली आहे. अनेक जण शेअर मार्केट आणि शेअर मार्केट वर आधारित म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तथापि आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्व असून अनेक जण पोस्टाच्या आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत.

काही जण बँकेच्या एफडी योजनेत देखील गुंतवणूक करत आहेत. तथापि आज आपण एलआयसीच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये दररोज 45 रुपये गुंतवल्यास तब्बल 25 लाख रुपये मिळणार आहेत.

यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात सुरक्षित गुंतवणुकीसाठी एलआयसीच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.

कोणती आहे ती योजना

आम्ही एलआयसीच्या ज्या बचत योजनेबाबत बोलत आहोत ती आहे जीवन आनंद पॉलिसी. जर तुम्हाला कमी प्रीमियममध्ये मोठी रक्कम तयार करायची असेल, तर एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी ही बचत योजना एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

ही एक टर्म पॉलिसीसारखीच बचत योजना आहे. जोपर्यंत तुमची पॉलिसी लागू आहे तोपर्यंत तुम्ही प्रीमियम भरू शकता. या योजनेत, पॉलिसीधारकाला फक्त एक नाही तर अनेक मॅच्युरिटी लाभ मिळतात. LIC च्या या योजनेत, किमान 1 लाख रुपयांची खात्री आहे, तर कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.

45 रुपये गुंतवल्यास मिळणार 25 लाख

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये, तुम्ही जर दरमहा 1358 रुपये जमा केलेत तर तुम्हाला 25 लाख रुपये मिळणार आहेत. महिन्याचे १३५८ रुपये म्हणजेच दिवसाला 45 रुपये गुंतवून तुम्ही एवढी मोठी रक्कम उभारू शकता.

तथापि, एलआयसीच्या या धोरणाकडे दीर्घकालीन योजना म्हणून पाहिले जाते. त्याची पॉलिसी टर्म 15 ते 35 वर्षे एवढी आहे. याचा अर्थ, जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये कुठे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर एलआयसीची ही योजना तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.

मात्र जर तुम्हाला पाच-दहा वर्षाच्या कालावधीतच चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही एलआयसीच्या दुसऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. जर तुम्ही दररोज 45 रुपये प्रमाणे या योजनेत 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर या योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 25 लाख रुपये मिळतील.

म्हणजे या पॉलिसीमध्ये 35 वर्षांसाठी दररोज 45 रुपये अर्थातच दरवर्षी 16,300 रुपयांचा प्रीमियम भरला तर 35 वर्षानंतर पाच लाख 70 हजार 500 रुपये जमा होणार आहेत.

म्हणजे पॉलिसीच्या मुदतीनुसार, मूळ विमा रक्कम 5 लाख रुपये असेल, ज्यामध्ये मॅच्युरिटी कालावधीनंतर तुम्हाला 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम बोनस दिला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe