निवृत्तीनंतर हमखास उत्पन्नाचा मजबूत आधार! LIC स्मार्ट पेन्शन योजनेतून दरमहा 10,880 पेन्शन कशी मिळते?

Published on -

LIC Pension Plan : देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Life Insurance Corporation of India (LIC) च्या विमा व गुंतवणूक योजना गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. याच योजनांपैकी LIC स्मार्ट पेन्शन योजना सध्या विशेष चर्चेत असून, ही योजना निवृत्तीनंतर नियमित आणि हमखास उत्पन्न देणारा सुरक्षित पर्याय मानली जात आहे.

LIC स्मार्ट पेन्शन योजना ही Immediate Annuity Plan प्रकारातील आहे. या योजनेत एकदाच (वन-टाइम) गुंतवणूक केल्यानंतर लगेचच पेन्शन सुरू होते आणि ती आयुष्यभर मिळते.

ही योजना सिंगल लाईफ तसेच पती-पत्नींसाठी जॉइंट लाईफ पर्यायामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठीही ही योजना उपयुक्त ठरते.

ही योजना Non-Linked आणि Non-Participating असल्यामुळे शेअर बाजारातील चढ-उतारांचा कोणताही परिणाम यावर होत नाही. त्यामुळे जोखीम न घेता निश्चित उत्पन्न हवे असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे.

या योजनेत किमान अ‍ॅन्युटी खरेदी रक्कम 1 लाख असून, कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. गुंतवणूकदार आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कितीही रक्कम गुंतवू शकतो.

LIC स्मार्ट पेन्शन योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसी घेतानाच पेन्शनची रक्कम निश्चित होते. गुंतवणूकदार मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडू शकतो.

तसेच दरवर्षी 3% किंवा 6% दराने पेन्शन वाढवण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर गुंतवलेली रक्कम वारसाला परत मिळण्याची सुविधाही या योजनेत दिली जाते.

LIC कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 20 लाखांची एकरकमी गुंतवणूक केली, तर त्याला वार्षिक 1,36,000 पेन्शन मिळू शकते. यानुसार मासिक पेन्शन सुमारे 10,880 इतकी होते. तिमाही पेन्शन 32,980 तर सहामाही पेन्शन 66,640 मिळते.

एकूणच LIC स्मार्ट पेन्शन योजना ही निवृत्त सरकारी कर्मचारी, खासगी नोकरीतील कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी आर्थिक स्थैर्य देणारी, सुरक्षित आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा विश्वासार्ह पर्याय ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe