LIC Policy: एलआयसीची ‘ही’ पॉलिसी घ्या आणि हॉस्पिटलच्या बिलची चिंता सोडा! बघा ए टू झेड माहिती

Published on -

LIC Policy:- सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये कुणाला कोणत्या प्रकारचा आजार उद्भवेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. जर रुग्णालयामध्ये ऍडमिट व्हायचा प्रसंग आला तर यासाठीचा खर्च बऱ्याच व्यक्तींच्या आर्थिक आवाक्याबाहेर जातो व त्यामुळे मोठा आर्थिक ताण व्यक्तीवरच नाही तर पूर्ण कुटुंबावर येऊ शकतो.

त्यामुळे अचानकपणे येणाऱ्या अशा खर्चापासून आपल्याला वाचता यावे त्यामुळे आरोग्य विमा घेण्याकडे आपल्याला लोकांचा कल असल्याचे दिसून येते. अगदी याच प्रकारे तुम्हाला देखील रुग्णालयाच्या आपत्कालीन खर्चापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुमच्याकरिता एलआयसीची जीवन आरोग्य पॉलिसी ही खूप महत्त्वाची आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून हॉस्पिटलचा जो काही खर्च येतो तो तुम्हाला पूर्ण करता येतो व येऊ शकणारा तुमच्यावरील संभाव्य आर्थिक ताण कमी होतो.

एलआयसीच्या जीवन आरोग्य विमा पॉलिसीचे वैशिष्ट्ये

एलआयसीची जीवन आरोग्य विमा पॉलिसी ही एक महत्त्वाची अशी पॉलिसी असून तुमच्या दवाखान्याच्या खर्चाची भरपाई या माध्यमातून तुम्हाला करता येते. या माध्यमातून तुम्ही तुमची पत्नी तसेच मुले, पालक आणि सासू-सासऱ्याचे देखील आर्थिक दृष्टिकोनातून संरक्षण करू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तुम्ही एकाच पॉलिसीमध्ये तुमचे संपूर्ण कुटुंब यामध्ये कव्हर करू शकतात. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तुम्हाला एलआयसीची ही पॉलिसी आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठी मदत करते.

कसा आहे या पॉलिसीचा प्रीमियम?

या पॉलिसीचा प्रीमियम बघितला तर पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचे वय किती आहे यानुसार तो ठरवला जात असतो. हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर समजा तुमचे वय 20 वर्ष आहे तर तुम्हाला वार्षिक प्रीमियम 1922 इतका लागतो. तीस वर्षाच्या व्यक्तीकरिता 2243, ती जर 40 वर्षाच्या वयामध्ये ही पॉलिसी घेत असेल तर त्याला वार्षिक 2799 प्रीमियम भरावा लागेल. पन्नास वर्षाच्या व्यक्तीसाठी 3768 रुपये इतका प्रीमियम लागेल. यावरून आपल्याला दिसून येते की जितकी जास्त वय असेल तितका जास्तीचा प्रीमियम यामध्ये लागतो.

हॉस्पिटलच्या खर्चाचे स्वरूप कसे?

समजा तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर या पॉलिसीच्या माध्यमातून तुमचा हॉस्पिटलचा जो काही खर्च आहे त्यातील 50 टक्के रक्कम ताबडतोब कव्हर होते. याकरिता तुम्हाला फक्त हॉस्पिटलच्या बिलाची छायाप्रत सादर करणे गरजेचे असते. तसेच गंभीर अपघात किंवा ऑपरेशन झाले असेल तर यासाठीचा क्लेम लवकरात लवकर दिला जातो.

 

इतकेच नाही तर यामध्ये ॲम्बुलन्सचा एक हजार रुपयांपर्यंतचा खर्च देखील कव्हर केला जातो. तसेच जीवन आरोग्य पॉलिसी अंतर्गत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी प्रत्येक दिवसाला 1000 ते 4 हजार रुपये पर्यंतची रक्कम मिळते व ती 720 दिवसांसाठी वापरता येऊ शकते. यामध्ये तुमची कव्हरेज रक्कम जर जास्तीचे असेल तर तुम्हाला 360 दिवसांसाठी दररोज आयसीयू करिता 8000 पर्यंतचा दावा मिळू शकतो. एलआयसीच्या जीवन आरोग्य पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पॉलिसीचा लाभ तुम्ही वर्षातून पाच वेळा घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News