Aadhaar Card Lock System :-आधार कार्ड किंवा आधार क्रमांक हा खूप महत्त्वाचा असून तुमच्या बँकिंग सुविधा पासून तर अनेक शासकीय कामांसाठी आधार कार्डचा वापर केला जातो.
बँकेच्या खात्यांना देखील आधार क्रमांक लिंक केल्यामुळे आता अनेक डिजिटल व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून आधार नंबर किंवा आधार कार्डला खूप महत्त्व आहे. बरेच काम करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येतो व तो ओटीपी शिवाय तुमचे काम होत नाही.
अशा अनेक पद्धतीने आधार कार्ड किंवा आधार क्रमांक हा महत्त्वाचा आहे. परंतु बऱ्याचदा आपल्या आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचे दिसून येते किंवा केला जातो. त्यामुळे आपले आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता बळावते. आधार कार्डचा गैरवापर होऊ नये याकरिता एक महत्त्वपूर्ण फिचर असून या माध्यमातून तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित करू शकतात.
आधार कार्ड लॉक सिस्टम
आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचे जाणवले तर तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक करू शकतात. याकरिता युआयडीएआयच्या माध्यमातून तुमचा डेटा सुरक्षित रहावा याकरिता अनेक फीचर्स आणले गेलेले आहेत. त्यातीलच आधार कार्ड लॉक हे फीचर खूप फायद्याचे आहे. त्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो व तुमची खाजगी माहिती देखील कुठे लिक होत नाही.
अशाप्रकारे करा तुमचे आधार लॉक
1- आधार बायोमेट्रिक्स लॉक करणे अत्यंत सोपे व सहज आहे. याकरिता तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्या ठिकाणी माय आधारचा पर्याय दिसतो. या पर्यावरण क्लिक केल्यावर तुम्हाला लॉग इन करावे लागेल व त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लॉक करता येईल.
2- आधार कार्ड लॉक करण्याकरिता तुम्हाला 16 डिजिट वर्चुअल आयडी क्रिएट करावा लागतो. या व्हीआयडी अर्थात वर्च्युअल आयडीच्या मदतीने तुम्ही तुमचे कार्ड लॉक करू शकतात. गरज असेल तेव्हा तुम्ही आधार कार्ड अनलॉक देखील करू शकतात. याकरिता देखील तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
3- या ठिकाणी माय आधार या पर्यायावर क्लिक करावे व त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय येतील. यामधून तुम्हाला लॉक किंवा अनलॉक हा पर्याय मिळेल. तुम्ही तुमचा वर्चुअल आयडी तयार केल्यावर आधार लॉक करण्याकरिता तयार केलेला वर्चुअल आयडी, पूर्ण नाव तसेच पिनकोड आणि कॅपच्या कोड इंटर करावा लागेल. त्यानंतर तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल आणि हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा आधार लॉक करता येईल.
आधार लॉकचा काय होईल फायदा?
आधार बायोमेट्रिक्स लॉक फीचर तुम्ही जेव्हा ऑन कराल तेव्हा इतर कोणीही तुमचा बायोमेट्रिकचा वापर करू शकणार नाही. म्हणजेच तुमच्या आधार संबंधीची कुठलीही माहिती संबंधितांना चोरी करता येणार नाही व त्याचा गैरवापर देखील करता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या वैशिष्ट्यामुळे तुम्ही तुमची होणारी आर्थिक फसवणूक देखील टाळू शकणार आहात.