गुंतवणूक फक्त 50 हजाराची अन कमाई चक्क लाखोंची! ‘हा’ बिजनेस सुरु करा अन स्वतः मालक बना

आजच्या काळात ऊर्जा बचतीसाठी विविध पर्याय वापरले जात आहेत. विजेची बचत व्हावी यासाठी एलईडी बल्बचा वापर झपाट्याने वाढला आहे. तुलनेने कमी वीज वापरत अधिक प्रकाश देणाऱ्या या बल्बने बाजारात मोठी क्रांती घडवली आहे. त्यामुळे एलईडी बल्ब बनवण्याचा अन विक्रीचा व्यवसाय हा अल्प गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देणारा पर्याय ठरत आहे.

Published on -

Low Investment Business Plan : अलीकडे भारतात नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण दररोज वापरल्या जाणाऱ्या एका प्रॉडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंग बिजनेस बाबत माहिती पाहणार आहोत.

आजच्या काळात ऊर्जा बचतीसाठी विविध पर्याय वापरले जात आहेत. विजेची बचत व्हावी यासाठी एलईडी बल्बचा वापर झपाट्याने वाढला आहे. तुलनेने कमी वीज वापरत अधिक प्रकाश देणाऱ्या या बल्बने बाजारात मोठी क्रांती घडवली आहे. त्यामुळे एलईडी बल्ब बनवण्याचा अन विक्रीचा व्यवसाय हा अल्प गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देणारा पर्याय ठरत आहे.

विशेष म्हणजे, हा व्यवसाय घरबसल्या सुरू करता येतो आणि सरकारकडूनही त्यासाठी मदत व प्रशिक्षण उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठी जागा लागणार नाही तसेच बाजारपेठेत दुकान सुद्धा लागणार नाही. दुकानासाठी जागा नसेल तर तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून सुरू करू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता.

व्यवसाय सुरू कसा करावा ?

एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. फक्त ५०,००० रुपयांत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी कोणतेही दुकान आवश्यक नाही, तो घरूनही सहज करता येतो. मात्र हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत (MSME) विविध संस्थांमार्फत एलईडी बल्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच, स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत अनेक ठिकाणी हे प्रशिक्षण उपलब्ध आहे. याशिवाय, काही खाजगी कंपन्याही एलईडी बल्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतात आणि व्यवसायासाठी लागणारी सामग्री पुरवतात.

प्रशिक्षणात काय शिकता येईल?

एलईडी बल्ब तयार करण्यासाठी काही तांत्रिक कौशल्यांची आवश्यकता असते. यामुळे तुम्हाला या व्यवसायाआधी प्रशिक्षण घ्यावेच लागणार आहे. या प्रशिक्षणात तुम्हाला एलईडी बल्बची मूलभूत रचना आणि कार्यप्रणाली, पीसीबी (Printed Circuit Board) डिझाईन आणि त्याचा वापर
एलईडी ड्रायव्हरचे कार्य आणि त्याचे महत्त्व, बल्बच्या फिटिंग आणि टेस्टिंग प्रक्रिया, साहित्य खरेदीसाठी योग्य पर्याय आणि पुरवठादार, सरकारी अनुदान योजना आणि व्यवसायसंबंधी नियमावली आणि बाजारपेठ आणि विक्री धोरणे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

एलईडी बल्ब व्यवसायातून नफा किती?

एलईडी बल्ब बनवण्याच्या व्यवसायात कमी खर्चात मोठा नफा मिळतो. एका बल्बची निर्मिती साधारण ५० रुपयांत होते, तर तो बाजारात १०० रुपयांना विकला जातो. म्हणजेच, एका बल्बवर ५० रुपयांचा नफा मिळतो. जर तुम्ही दररोज १०० बल्ब बनवले, तर ५,००० रुपये प्रतिदिन कमवू शकता. म्हणजेच, महिन्याला १.५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. अर्थातच ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही दरमहा दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता.

सरकारी मदत आणि अनुदान योजना

भारत सरकारकडून एलईडी बल्ब निर्मितीसाठी विविध अनुदान योजना राबविल्या जातात. PMEGP (प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना), मुद्रा लोन योजना, स्टँड अप इंडिया योजना यांसारख्या योजनांतर्गत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे नव्या उद्योजकांसाठी ही एक उत्तम संधी राहणार आहे.

बाजारपेठ आणि विक्री

एलईडी बल्बसाठी मोठी मागणी असल्याने विक्रीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही थेट किरकोळ विक्री, घाऊक विक्री, ऑनलाइन मार्केटिंग, सरकारी टेंडर, मोठ्या कंपन्यांना पुरवठा अशा विविध मार्गांनी तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

नवीन उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि मोठा नफा कमवायचा असेल, तर एलईडी बल्ब निर्मिती हा सर्वोत्तम पर्याय आहे. योग्य प्रशिक्षण, सरकारच्या मदतीचा लाभ आणि चांगल्या विक्री धोरणामुळे तुम्ही या क्षेत्रात मोठे यश मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe