LPG Cylinder : देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता देशातील काही एलपीजी ग्राहकांना ऑनलाइन सिलेंडर बुक करता येणार नाहीये. यामुळे नक्कीच काही ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे.
या ग्राहकांना ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही
देशातील काही एलपीजी ग्राहकांना आता ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही, म्हणजे या ग्राहकांना आता सिलेंडर मिळवण्यात अडचणी येणार आहेत. खरे तर गेल्या एका वर्षभरापासून एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांची ई – केवायसीची प्रक्रिया सुरू आहे.

एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना ई केवायसी ची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी अनेक ग्राहक केवायसीची प्रक्रिया करत नसल्याचे उघडकीस आले आहे. ग्राहकांना सातत्याने केवायसी करण्यासाठी सांगितले जात आहे.
मात्र असे अनेक एलपीजी ग्राहक आहे जे की या प्रक्रियेमध्ये रस दाखवत नाहीयेत आणि आता याच ग्राहकांना पेट्रोलियम कंपन्यांकडून मोठा दणका दिला जाणार आहे. अशा ग्राहकांवर पेट्रोलियम कंपन्या मोठी कारवाई करणार आहेत.
ज्या ग्राहकांनी ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांना आता ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही. केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी यासाठी गॅस एजन्सीच्या माध्यमातून सातत्याने ग्राहकांना संदेश पाठवले जात आहेत.
गॅस एजन्सी कडून मोबाईलवर या संदर्भातील मेसेज पाठवले जात असतानाही ग्राहकांकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. म्हणूनच आता जे ग्राहक केवायसीची प्रक्रिया करणार नाहीत त्या ग्राहकांना ऑनलाइन गॅस सिलेंडर बुक करता येणार नसल्याचे बोलले जात आहे.
म्हणजे अशा ग्राहकांची ऑनलाईन गॅस बुकिंग ची सुविधा बंद करण्यात येणार आहे. यामुळे जर तुम्हीही एलपीजी ग्राहक असाल आणि अद्याप केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही ही लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला अवि नाहीतर तुम्हाला सिलेंडर बुक करताना अडचणी येणार आहेत.
केवायसी ची प्रक्रिया कशी करणार?
मिळालेल्या माहितीनुसार, KYC करण्यासाठी, ग्राहकांना आपल्या गॅस एजन्सी मध्ये जावे लागणार आहे. ज्या गॅस कंपनीकडून त्यांनी सिलेंडर घेतला आहे त्या एजन्सीकडे जाऊन ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, गॅस कनेक्शनचे पुस्तक आणि मोबाईल सोबत घ्यावे लागतील.
तिथे बायोमेट्रिक्सद्वारे e-KYC केली जाणार आहे. केवायसी च्या प्रक्रियेसाठी आधार आणि गॅस ग्राहक नंबर असणे आवश्यक आहे. याशिवाय ग्राहकांना मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.