LPG गॅस एजन्सी सुरु करण्यासाठी किती खर्च करावा लागतो ? एजन्सी सुरू केल्यानंतर किती कमाई होते?

तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण अशा एका बिजनेसची माहिती पाहणार आहोत ज्यातून महिन्याकाठी एक लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा कमवता येऊ शकतो.

Published on -

LPG Gas Agency : अलीकडे एलपीजी गॅस ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषता केंद्रातील मोदी सरकारने पीएम उज्वला योजना सुरू केल्यापासून गॅस ग्राहकांची संख्या अधिक वाढली आहे. या योजनेमुळे खेड्यापाड्यांमध्ये देखील गॅस सिलेंडर वाढले आहेत. देशातील ग्रामीण भागात चुलीचा वापर कमी झाला आहे आणि गॅस सिलेंडरचा वापर वाढला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या पीएम उज्वला योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरात जवळपास दहा कोटी गॅस कनेक्शन सुरू करण्यात आले आहेत आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. 2014 मध्ये भारतात एकूण 14.52 कोटी गॅस कनेक्शन होते मात्र 2025 मध्ये देशातील गॅस ग्राहकांची संख्या 33.52 कोटी इतकी झाली आहे.

अशा स्थितीत जर तुम्हाला ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. तुम्ही एलपीजी गॅस एजन्सी सुरू करून महिन्याला चांगली मोठी कमाई करू शकता. पण हा व्यवसाय कसा सुरू करायचा, यासाठी किती खर्च येतो, यासाठी अर्ज कुठे करावा लागतो एजन्सी सुरू केल्यानंतर साधारणता किती कमाई होऊ शकते ? याच साऱ्या बाबींची आज आपण या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतात गॅस एजन्सी देणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत?

जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे भारतात तीन सरकारी तेल कंपन्या गॅस एजन्सी प्रोव्हाइड करतात. इंडियन ऑइल (IOC) कंपनीकडून इंडेन,भारत पेट्रोलियम (BPCL) कडून भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) कडून एचपी गॅसच्या माध्यमातून गॅस एजन्सीची डीलरशिप दिली जाते. जर तुम्हालाही या कंपन्यांपैकी एखाद्या कंपनीकडून गॅस एजन्सीची डीलरशिप घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपयांचे शुल्क भरावे लागेल जे की नॉन रिफंडेबल असते म्हणजेच परत केले जात नाही. www.lpgvitarakchayan.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून इच्छुकांना गॅस एजन्सीच्या डीलरशिप साठी अर्ज सादर करता येतो.

गॅस एजन्सी साठीची पात्रता काय?

 गॅस एजन्सीसाठी 21 ते साठ वर्षे वयोगटातील आणि किमान दहावी पास नागरिक अर्ज करू शकतात. नागरिकांना आपल्या भागात गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर संबंधित कंपन्यांकडून मुलाखत घेतली जाते. मुलाखतीनंतर मग पात्र अर्जदारांची गॅस एजन्सी साठी निवड केली जाते.

जर तुम्ही सादर केलेल्या भागात आधीच अर्ज दाखल झालेले असतील तर अशा प्रकरणात लकी ड्रॉच्या माध्यमातून संबंधित पात्र उमेदवारांची निवड करण्यात येते. मात्र एजन्सी सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे रस्त्यालगत जमीन असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सहज गॅसची गाडी पोहोचू शकते अशा ठिकाणची जागा आवश्यक असते.

गॅस सिलेंडर साठवण्यासाठी गोदामाची सुद्धा आवश्यकता असते. अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे जर अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसेल तर त्यांनी दीर्घ कालावधीसाठी भाडेतत्त्वावर जमीन घेणे आवश्यक आहे. गॅस एजन्सी डिस्ट्रीब्यूटरशीप देण्याआधी तेल कंपनी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी सुद्धा केली जाते. 

 गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी किती खर्च करावा लागतो

गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मीडिया रिपोर्टनुसार एक गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी साधारणतः 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च करावा लागू शकतो.

गॅस एजन्सी मधून किती कमाई होऊ शकते?

मिळालेल्या माहितीनुसार 14.2kg घरगुती गॅस सिलेंडर वर गॅस एजन्सी चालकाला 73.08 रुपयापर्यंतचे कमिशन मिळते. पाच किलो ग्रॅमच्या सिलेंडरवर जवळपास 36.54 रुपयापर्यंतचे कमिशन मिळते. अशा तऱ्हेने जर एखादा गॅस सिलेंडर वितरक महिन्याला 3000 गॅस सिलेंडरचे वितरण करत असेल तर त्याला साधारणता 2.21 लाख रुपयांपर्यंतचे कमिशन मिळू शकते आणि यातून खर्च वजा केला असता त्याला एक लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!