LPG Gas Customer : आधी स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चुलीचा वापर होत होता. यामुळे ग्रामीण भागातील महिलांकडून आरोग्यविषयक अनेक तक्रारी समोर येत असत. चुलीच्या धुरामुळे महिलांना विविध आजारांनी ग्रसले होते.
यामुळे सरकारने पीएम उज्वला योजना सुरू केली. या अंतर्गत देशभरातील गरिबांनी गरजू महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाऊ लागले. महत्वाची बाब म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी सरकारने या योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.

या अंतर्गत आता देशभरातील आणखी 25 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. याशिवाय उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस भरण्यासाठी सुद्धा अनुदान मिळते. यामुळे आता देशात एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे.
स्वयंपाकासाठी आता गॅसचा वापर होतोय. यामुळे महिलांचे आरोग्य सुरक्षित झाले आहे. दरम्यान आज आपण LPG गॅस कनेक्शन सोबत ग्राहकांना कोणकोणते लाभ मिळतात याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
खरे तर एलपीजी गॅस सिलेंडर हे सुरक्षित असतात पण काही चुकांमुळे किंवा त्रुटींमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट होतो. गॅस सिलेंडरचा स्फोट हा फारच भीषण अपघात असतो. यात जीवितहानी सुद्धा होत असते.
पण गॅस सिलेंडरचा अपघात झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते. एलपीजी गॅस सिलेंडर अपघातांसाठी सार्वजनिक विमा काढलेला असतो. हा विमा ग्राहकांच्या नावे नसतो तर तेल कंपन्यांकडून काढलेला असतो.
या अंतर्गत गॅस सिलेंडरच्या अपघातात जीवित हानी झाल्यास प्रतिव्यक्ती सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जात असते. तसेच मेडिकल खर्चासाठी प्रति व्यक्ती दोन लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळते.
या अंतर्गत एका अपघातासाठी 30 लाख रुपये पर्यंतची रक्कम नुकसान भरपाई म्हणून मंजूर होत असते. ग्राहकांच्या रजिस्टर पत्त्यावर झालेल्या संपत्तीच्या नुकसानीसाठी या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळते.
एका वर्षात जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांचा विमा दिला जातो. अशा प्रकारचा अपघात झाल्यानंतर ग्राहकांनी तात्काळ याची माहिती आपल्या डिस्ट्रीब्यूटरला दिली पाहिजे. यानंतरची पुढील प्रक्रिया तेल कंपनीकडून आणि विमा कंपनीकडून पूर्ण केली जाते.
नुकसान भरपाई साठी ग्राहकांना थेट विमा कंपन्यांसोबत संपर्क साधण्याची गरज नसते. ग्राहकांना फक्त घटना घडल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र किंवा मेडिकल बिल गॅस वितरक कंपनीकडे द्यावे लागते. यानंतरची पुढील प्रक्रिया सदर वितरक कंपनीकडून केली जाते.