GST मध्ये कपात केली पण गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत ! किती रुपयांनी महाग झाला एलपीजी गॅस ? वाचा….

GST मध्ये कपात केली पण गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत ! किती रुपयांनी महाग झाला एलपीजी गॅस ? वाचा….

LPG Gas Cylinder : अलीकडे सरकारने सर्वसामान्यांसाठी जीएसटी मध्ये मोठी कपात केली आहे. सरकारने काही जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी थेट शून्य केलीय. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळतोय. 22 सप्टेंबर पासून लागू झालेली जीएसटीचे नवे धोरण सर्वसामान्यांसाठी दिवाळीच्या आधीच मिळालेला दिवाळी बोनस आहे.

मात्र आता सर्वसामान्यांना चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 15 -16 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. 

दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली आहे. पण याचा प्रत्यक्ष सर्वसामान्यांवर परिणाम होणार नसला तरी देखील अप्रत्यक्षरीत्या याचा परिणाम जाणवेल.

दिवाळी फराळ यामुळे नक्कीच महाग होईल. खरतर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत सुधारणा होत असते. कधी किमती वाढतात तर कधी कमी होतात. त्यानुसार आज एक ऑक्टोबर 2025 रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला आहे.

नव्या दरानुसार दिल्लीमध्ये 1580 रुपयांना मिळणारा 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर आता 1595.50 रुपयांना मिळणार आहे. अर्थात राजधानीत याची किंमत 15.50 रुपयांनी वाढली आहे. कोलकात्यात 1684 रुपयांच्या 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 1700 रुपये झालीये.

अर्थात येथे याची किंमत 16 रुपयांनी वाढली आहे. मुंबईत हा सिलेंडर 1547 रुपयांचा झालाय. यापूर्वी याची किंमत 1531.50 रुपये होती. चेन्नईत 19 किलोचा सिलेंडर 1754 रुपयांचा झाली आहे. थोडक्यात देशातील सर्वच प्रमुख शहरात 19 किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत 15 – 16 रुपयांनी वाढली आहे.

तर 14 किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर आज पण स्थिर आले आहेत. पण केंद्र सरकारने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएम उज्वला योजना 2.0 सुरू केली आहे. या अंतर्गत 25 लाख नव्या प्रधानमंत्री उज्ज्वला कनेक्शनची घोषणा केली आहे. याचा नक्कीच सर्वसामान्यांना मोठा फायदा मिळणार आहे. आता आपण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जाणून घेऊयात. 

14 किलो LPG Gas च्या किंमती? 

मुंबई – 852.50 रुपये

दिल्ली – 853 रुपये

लखनौ – 890.50 रुपये

अहमदाबाद – 860 रुपये

हैदराबाद – 905 रुपये 

वाराणसी – 916.50 रुपये 

गाझियाबाद – 850.50 रुपये 

पटना – 951 रुपये