LPG Gas Cylinder Price Hike : गेल्या काही वर्षांपासून देशातील जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. पेट्रोल डिझेलचा सर्वच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढली आहे. दरम्यान महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे.
घरगुती वापरासाठी लागणाऱ्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती तब्बल 50 रुपयांनी वाढल्या असून, ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट यामुळे बिघडणार आहे परिणामी महिलांमध्ये सरकार विरोधात पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळू शकते.
खरे तर गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर होत्या आणि यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत होता. पण आज अचानक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय झाला असून याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.
सध्या मुंबई आणि परिसरात घरगुती सिलेंडरचा दर 802 रुपये आहे. नव्या दरांनुसार, ग्राहकांना आता 852 रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, ही दरवाढ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही लागू होणार आहे, त्यामुळे गरीब आणि गरजू वर्गालाही याचा फटका बसणार आहे.
दरवाढीच्या या निर्णयामुळे आधीच अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेला सर्वसामान्य वर्ग आणखी अडचणीत सापडला आहे. स्वयंपाकघराचा खर्च वाढल्याने कुटुंबाच्या महिन्याच्या बजेटवर थेट परिणाम होईल.
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ केली आहे. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की या शुल्कवाढीचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार नाही. पेट्रोल आणि डिझेलचे बाजारातील दर सध्या जैसे थेच राहतील.
नक्कीच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत अचानकपणे 50 रुपयांची वाढ करण्यात आली असल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा विपरीत परिणाम होणार असून यामुळे महिन्याचे बजेट फिस्कटणार आहे.