सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा ! LPG गॅस सिलेंडर झाले स्वस्त ! इतक्या कमी झाल्यात किंमती, नवीन दर लगेचच तपासा

आज नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. आज एक मे 2025 रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

Published on -

LPG Gas Cylinder Price : देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी त्याच्याएक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत आज महिन्याच्या पहिल्या दिवशी मोठा बदल झाला आहे. सिलेंडरच्या दरात आज १७ रुपयांची कपात करण्यात आली आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईतुन काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार आहे. आज कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत म्हणजे १९ किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल झालाय. यामुळे व्यावसायिक आणि हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे

आणि अप्रत्यक्षपणे याचा सामान्य नागरिकांना सुद्धा फायदा होणार आहे. खरेतर, दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी दरांमध्ये बदल होत असतो. त्यानुसार आज मे महिन्यात सुद्धा बदल झाला अन आजपासून नवीन दर लागू झाले आहेत. आता आपण गॅस सिलेंडरचे नवीन दर चेक करणार आहोत. 

कसे आहेत नवीन दर? 

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबईत १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत आता १६९९ रुपये झाली असून, यापूर्वी ही किंमत १७१३.५० रुपये होती. तसेच कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडर १८६८ रुपयांवरून १८५१.५० रुपये झाला आहे.

चेन्नईत याची किंमत १९२१.५० रुपयांवरून १९०६.५० रुपये झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.

आज सुद्धा मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत ८५२.२० रुपये इतकीच आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, कमर्शियल सिलिंडरच्या दरात कपात झाल्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर होतो, अशा ठिकाणी याचा फायदा होणार आहे.

विशेषतः हॉटेल्स, केटरिंग सेवा, उद्योग क्षेत्र यांना यामुळे थोडा दिलासा मिळेल आणि सामान्य नागरिकांना सुद्धा याचा फायदाच होणार आहे. ही दरकपात सामान्य ग्राहकांवर थेट प्रभाव टाकणार नाही, मात्र व्यावसायिकांसाठी ही नक्कीच चांगली बातमी ठरली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News