LPG Gas Cylinder Refill New Update : एलपीजी गॅस ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आता एलपीजी गॅस सिलेंडर रिफील करणे आणखी किचकट होणार आहे. खरे तर सध्याच्या प्रक्रियेनुसार एलपीजी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर संबंधित वितरकाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर घरपोच केला जातो. मात्र गॅस सिलेंडर जेव्हा घरी येतो त्यावेळी गॅस ग्राहकाला काहीच करण्याची गरज नसते. पण आता ही प्रक्रिया थोडीशी बदलली गेली आहे.
नवीन प्रक्रियेनुसार आता गॅस सिलेंडर मिळवणे थोडेसे अवघड होणार आहे. आता गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी सांगावा लागणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण ही नवीन प्रक्रिया नेमकी कशी काम करणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कशी आहे नवीन प्रक्रिया
खरे तर तुम्ही सध्या गॅस सिलेंडरची बुकिंग जशी करतात तशीच बुकिंग नवीन प्रक्रियेनुसार देखील करायची आहे. पण जेव्हा तुमच्या गॅस वितरकाकडून तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाईल त्यावेळी ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी सदर गॅस वितरकाच्या कर्मचाऱ्याला द्यावा लागणार आहे.
म्हणजे आता ओटीपी शिवाय गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. खरे तर आधीही हा नियम लागू होता मात्र आता हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे.
आधी हा नियम कंपल्सरी नव्हता यामुळे कोणीच ओटीपी शेअर करत नव्हते. शिवाय गॅस पोहोच करणाऱ्या कर्मचाऱ्याकडूनही हा ओटीपी मागितला जात नसे. पण आता हा नियम कंपल्सरी करण्यात आला असून यामुळे आता ओटीपी दिला नाही तर गॅस सिलेंडर देखील मिळणार नाही.
एकंदरीत आता सिलेंडर ऑनलाईन बुक केल्यावर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल, गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागणार आहे.
जर हा ओटीपी दाखवला गेला नाही तर ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही. म्हणजेच ग्राहकाचा नोंदणी केलेला मोबाईल आता गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेताना घरीच असणे आवश्यक आहे. त्यामुळे मात्र ज्येष्ठ नागरिकांची आणि खेड्यापाड्यात असणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.