LPG Gas Price : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत असतात. यानुसार जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आज घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत आज कपात करण्यात आली आहे.

खरंतर व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने बदल होत आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बऱ्याच महिन्यांपासून कायम आहेत. दरम्यान आता आपण घरगुती आणि व्यवसाय गॅस सिलेंडरच्या सध्याच्या किमती जाणून घेणार आहोत.
व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत किती बदल झाला?
एलपीजी ग्राहकांना जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठी भेट मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडियन ऑइल कडून 19 किलो वजनी गॅस सिलेंडरची किंमत चक्क 24 रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हे नवे दर आज, एक जुलै 2024 पासून लागू राहणार असून आज पासून ग्राहकांना नव्या दरात सिलेंडर उपलब्ध होतील असेही कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान आजच्या या निर्णयानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलो वजनी सिलेंडर 1723.50 रुपयांना मिळणार आहे.
आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडर 1674.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये या सिलेंडरची किंमत 1826 रुपये राहणार आहे. तसेच चेन्नईमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडर 1881 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
म्हणजेच कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत देशातील प्रमुख चार महानगरांमध्ये 1900 रुपयांपेक्षा कमीच आहे. आता आपण घरगुती गॅस सिलेंडरची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊयात.
घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कशी आहे?
घरगुती गॅस सिलेंडरची किंमत याही महिन्यात स्थिर राहिली आहे. 2 महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली मात्र त्यानंतर किमतीत कोणताच बदल झालेला नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वेळी जो बदल झाला तो बऱ्याच महिन्यांनी झाला होता. आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर राहिल्यात आणि यामुळे साहजिकच गृहिणींना याचा दिलासा मिळणार आहे.
घरगुती गॅस सिलेंडर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 853 रुपयांना उपलब्ध होत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे 14.2 किलो वजनी सिलेंडर 852.50 रुपयांना उपलब्ध होत आहे.
कोलकत्ता मध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सर्वाधिक आहे या ठिकाणी 879 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होतो. चेन्नई बाबत बोलायचं झालं तर येथे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 870.50 रुपये इतकी आहे.