LPG Gas Price Today : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात, घरगुती गॅस दर स्थिर

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांसाठी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. १९ किलो वजनी निळ्या गॅस सिलेंडरची किंमत आज कमी करण्यात आली आहे.

Updated on -

LPG Gas Price Today : आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली अन या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आज तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे.

कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत आज ४१ रुपयांची घट करण्यात आली असून, हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर कसे आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

कमर्शियल व्यावसायिक सिलेंडरच्या लेटेस्ट किमती

कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता १,७६२ रुपये झालीये. देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईत हा सिलिंडर १,७१३.५० रुपयांना मिळणार आहे.

कोलकात्यात १,८६९.५० आणि चेन्नईमध्ये १,९२१.५० रुपये एवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून व्यावसायिक गॅसच्या किंमतीत सतत कपात होत आहे.

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. पण तीन महिन्यांपूर्वी अर्थातच डिसेंबर २०२४ मध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४ रुपयांची वाढ झाली होती.

मात्र जानेवारी महिन्यापासून आता सलग चौथ्यांदा कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला असला तरी देखील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तशाच कायम ठेवण्यात आल्या आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या लेटेस्ट किमती

एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये वारंवार बदल होत आहे तर दुसरीकडे घरगुती एलपीजीच्या किमती मात्र स्थिर आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मार्च २०२५ मध्ये १४.२ किलोच्या घरगुती गॅसच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतरचे दर अजूनही कायमच आहेत. दिल्लीमध्ये घरगुती गॅस ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe