Changing Rules 1st January : उद्यापासून नवीन वर्ष 2024 सुरु होणार आहे. सगळीकडे लोकांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्साह शगेला पोहोचला आहे. मात्र नवीन वर्ष देशातील नागरिकांसाठी खिशाला कात्री लावणारे ठरू शकते.
नवीन वर्षात देशातील अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे थेट सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. LPG गॅसच्या किमती ते UPI पेमेंटसह मोठे बदल उद्यापासून होणार आहेत.

1. LPG सिलेंडरच्या किमती बदलणार
देशात दरमहिन्याला LPG गॅसच्या किमती बदलत असतात. आता नवीन वर्षी 1 जानेवारी 2024 ला देखील गॅसच्या नवीन किमती जाहीर केल्या जाणार आहेत. LPG गॅसच्या किमतीचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
घरातील गॅसच्या किमतीमध्ये बऱ्याच दिवसांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र सरकारने व्यावसायिक गॅसच्या किमती अलीकडेच कमी केल्या आहेत. नवीन वर्षात गॅसच्या किमती कमी होण्याची लोकांना अपेक्षा आहे.
घरगुती गॅसच्या किमती मुंबईत 902.50 रुपये, दिल्लीत 903 रुपये, चेन्नईमध्ये 918.50 रुपये आणि कोलकात्यात 929 रुपये आहे. आता उद्या ग्राहकांच्या खिशावर आर्थिक परिणाम होणार नाही की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2. बँक लॉकर करार
नवीन वर्षात बँक लॉकरच्या नियमांत देखील बदल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकर करारामध्ये सुधारणा केली आहे. ज्या ग्राहकांनी बँक लॉकर घेतली आहेत अशा लोकांना नवीन बँक लॉकर करारावर 31 डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी करण्याची मुदत दिली आहे. जर असे न केल्यास बँकेकडून लॉकर गोठवण्यात येणार आहे.
3. UPI वापरकर्ते लक्ष द्या
UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी देखील 1 जानेवारी ही तारीख महत्वाची आहे. ज्या ग्राहकांची एक वर्षाहून अधिक काळ UPI पेमेंट करणारी Paytm, Google Pay, Phone Pay बॅन असतील तर ते UPI आयडी ब्लॉक करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घेतला आहे. त्यामुळे तुम्ही त्वरित UPI वरून पेमेंट करा.
4. नवीन सिम कार्ड मिळविण्यासाठी केवायसी
नवीन सिम कार्ड खरेदी कर्णयसाठी देखील 1 जानेवारीपासून मोठे बदल केले जाणार आहेत. दूरसंचार विभागाकडून आता कागदावरील केवायसी प्रक्रिया बंद केली जाणार आहे. आता नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी कागदी फॉर्म भरण्याची गरज नाही. डिजिटल केवायसी म्हणजेच ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला लगेच सिम कार्ड दिले जाईल.
5. आयटीआर फाइलिंग करण्याची शेवटची मुदत
आयटीआर फाइलिंग करण्याची तुमच्याकडे आता शेवटची मुदत आहे. आयटीआर फाइलिंग करण्याची 31 जुलै 2023 ही शेवटची मुदत होती मात्र ती वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही दंडाशिवाय तुम्ही आयटीआर फाइलिंग करून घ्या.
करदात्यांचे उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, 5,000 रुपयांपर्यंत दंड लागेल तर 5,00,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल.