Lucky Rashi : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. सूर्य आणि शुक्र ग्रह देखील राशी परिवर्तन करतात. सूर्य आणि शुक्र हे नवग्रहातील दोन अतिशय महत्त्वाचे ग्रह आहेत. मार्चच्या या आठवड्यात शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 17 मार्च रोजी शुक्र आणि सूर्यग्रह एकाच राशीत येणार आहेत. यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा वाईट काळ आता भूतकाळात जमा होणार आहे. वास्तविक, या आठवड्यात शुक्र आणि सूर्य मीन राशींमध्ये गोचर करणार आहेत.
म्हणजेच शुक्र आणि सूर्य ग्रह मीन राशीमध्ये येणार आहेत, दरम्यान शुक्र आणि सूर्य यांच्या संयोजनाने शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. या राज योगामुळे राशी चक्रातील काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांना या आठवड्यात मनानुसार यश मिळू शकते. त्याच वेळी, या लोकांचा सन्मान देखील वाढणार आहे. या आठवड्यात करिअरसंदर्भात नवीन नियोजन केल्याने चांगला फायदा सुद्धा मिळणार आहे. आता आपण शुक्र आणि सूर्यग्रहाच्या मीन राशीमधील युतीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार
मिथुन : या राशीच्या लोकांसाठी, मार्चचा पुढील आठवडा विशेष खास ठरणार आहे. हा आठवडा आपल्या कारकीर्दीसाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाऊ शकते कारण या आठवड्यात मिथुनच्या लोकांना पुढे जाण्यासाठी बर्याच चांगल्या संधी मिळतील. तसेच, यावेळी आपल्या प्रभावशाली लोकांशी संबंध तयार होतील, ज्याच्या मदतीने आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल.
लव्ह पार्टनरशी आपले नाते चांगले मधून होणार आहे. विवाहित जीवन आनंदी होईल. आपल्याला आपल्या नातेवाईकांकडून पूर्ण समर्थन मिळणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करणार आहात. तुमचा वाईट काळ आता जवळपास संपणार आहे.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांचा वाईट काळ देखील आता संपणार आहे. करिअरच्या बाबतीत आणि उद्योगासाठी हा काळ विशेष अनुकूल राहणार आहे. 17 मार्चपासून या राशीच्या लोकांचे भाग्य जणू काही उजळणार आहे. हे लोक ज्याला हात लावतील ते आता सोनं बनेल अशी परिस्थिती तयार होणार आहे.
या लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडून आणि जवळच्या लोकांकडून आगामी काळात पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. यामुळे हे लोक आपल्या आयुष्यात चांगली प्रगती करतील असे म्हटले जात आहे. आर्थिक दृष्ट्या सुद्धा हा काळ चांगला अनुकूल राहणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, वैवाहिक जीवन सुखी होईल तसेच आरोग्याच्या समस्या देखील आता दूर होणार आहेत.
कन्या : मिथुन आणि कुंभ राशी प्रमाणेच कन्या राशीच्या लोकांचा वाईट काळ सुद्धा आता भूतकाळात जाणार आहे. या लोकांना आता फक्त आणि फक्त चांगल्या दिवसाचा आनंद घ्यायला मिळणार आहे आणि म्हणून हे लोक आपल्या आयुष्यात चांगली प्रगती करताना दिसतील.
कन्या राशीच्या लोकांनी जर आपला आळस कंट्रोल केला तर हे लोक नक्कीच चांगली प्रगती करणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या तर फायद्याचा राहणारच आहे शिवाय तुमचा समाजात मानसन्मान सुद्धा वाढणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहील सोबतच व्यावसायिकांना देखील या काळात चांगला लाभ मिळणार आहे.
सिंह : मार्चच्या 17 मार्च ते 22 मार्च या आठवड्यात या लोकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे. नशीब आणि कर्माच्या मदतीने आपण इच्छित यश मिळवाल. जर आपले पैसे एखाद्या योजनेत किंवा व्यवसायात गुंतलेले असतील तर ते जवळच्या मित्रांच्या किंवा प्रभावी व्यक्तीच्या मदतीने परत मिळू शकतात असे संकेत मिळत आहेत. राजकारणात असणाऱ्यांना चांगला लाभ मिळेल तसेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना देखील या काळात चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे.
या लोकांची समाजात असणारी इमेज आता पूर्णपणे बदलणार आहे, यांची विश्वासार्हता आणि लोकप्रियता वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आठवड्याच्या मध्यभागी, आपल्याला धार्मिक कामांमध्ये अधिक रस वाटू लागेल आणि यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन सकारात्मक बदल सुद्धा होणार आहेत.
वृषभ : या राशीच्या लोकांचा वाईट काळ सुद्धा आता संपणार आहे. 17 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंतच्या आठवड्यात या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. आपण या आठवड्यात इच्छित यश मिळवू शकता. फक्त आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. तथापि, आर्थिक क्षेत्रात आपल्याला विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता असेल.
या कालावधीत कोणतीही घाईघाईने काम करणे टाळा. यासह, जर आपण या काळात आपल्या भावंडांसह काही काम सुरू करण्याचा प्रयत्न करीत असाल तर आपल्याला 100% यश मिळणार आहे. जे लोक एखाद्याच्या प्रेमाच्या नात्यात आहेत ते आपल्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवतील. तसेच, या आठवड्यात आपण आपल्या व्यवसायाबद्दल काही नवीन नियोजन करू शकता.