Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रातील नवग्रह, बारा राशी आणि 27 नक्षत्र यांना विशेष स्थान आहे. ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रहाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. दरम्यान जेव्हा केव्हा नवग्रहांचे राशी अथवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा काही शुभ योगाची निर्मिती होते.
अशातच आता 3 एप्रिल 2025 रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार असून, 6 एप्रिल रोजी चंद्र कर्क राशीत गोचर करेल. या युतीमुळे महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होणार आहे, ज्याचा परिणाम काही राशींवर विशेष शुभ होईल.

या संबंधित राशीच्या लोकांचा वाईट काळ आता पूर्णपणे समाप्त होणार आहे आणि त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे. या लोकांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
वृश्चिक : या राशीसाठी हा योग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात प्रलंबित कामांमध्ये यश मिळेल, तसेच व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात नवी संधी उपलब्ध होतील. देश-विदेशात प्रवासाचे योग संभवतात. मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची संधी असेल.
तूळ : वृश्चिक राशी प्रमाणेच तुळा राशीच्या लोकांचा वाईट काळ सुद्धा आता संपणार आहे. 6 एप्रिल नंतर या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक परिवर्तन पाहायला मिळणार आहे. दोन ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा कालखंड फायदेशीर ठरेल.
जे लोक नोकरी करत असतील त्यांना नोकरीमध्ये पगार वाढी सारखी आणि नोकरीत पदोन्नतीची संधी असेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि व्यावसायिकांना आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि व्यवसायात प्रगती होईल.
कन्या : वर सांगितलेल्या दोन्ही राशी प्रमाणेच कन्या राशीच्या लोकांनाही या काळात विशेष फायदा मिळणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. या लोकांचा बँक बॅलन्स या काळात चांगला वाढेल असे दिसते.
उत्पन्नवाढ होईल आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खर्च नियंत्रित राहील आणि इच्छित उद्दिष्टे पूर्ण होतील.