Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिन्याचे शेवटचे काही दिवस राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचे ठरणार आहे. खरे तर ज्योतिष शास्त्र असे सांगते की नवग्रहातील ग्रहांच्या चाली मानवी जीवनावर थेट परिणाम करत असतात.
नवग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि याचाच राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.

दरम्यान मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवग्रहांच्या याच चालीमुळे काही अद्भुत योग तयार होणार आहेत. 24 मार्च 2025 पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात चंद्र आणि गुरु एकमेकांपासून मध्यभागी उपस्थित राहतील अन याचा परिणाम म्हणून राशीचक्रातील अनेक राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र आणि गुरु ग्रहाच्या याच चालीमुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. दरम्यान आता आपण याच गजकेसरी राजयोगाचा प्रभाव म्हणून राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता संपेल याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
मकर : या लोकांचा वाईट काळ आता संपणार आहे उद्यापासून अर्थातच 24 तारखेपासून या लोकांचे अच्छे दिन सुरू होतील. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा हा या राशीच्या लोकांसाठी विशेष अनुकूल राहणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या महिला मित्राकडून या काळात चांगले सहकार्य मिळणार आहे.
या राशीच्या लोकांचा समाजात मोठा मानसन्मान होणार आहे. या राशीच्या काही लोकांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात होणार आहे. लव लाइफ साठी हा काळ अनुकूल राहणार आहे. कुटुंबात सुद्धा आनंदाचे वातावरण राहील आणि या लोकांना आपल्या पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.
वृश्चिक : मकर राशि प्रमाणेच या राशीच्या लोकांना देखील मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा फायद्याचा ठरणार आहे. या काळात यावर राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मात्र या लोकांनी अनावश्यक गोष्टीवर खर्च करू नये. नोकरदार वर्गासाठी हा काळ अनुकूल राहणार आहे करिअरमध्ये चांगली ग्रोथ पाहायला मिळणार आहे. जे लोक व्यवसाय करतात त्यांना दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात.
तुळा : 24 मार्चपासून मकर आणि वृश्चिक राशी प्रमाणेच या राशीच्या लोकांच्या आयुष्यातही चांगली भरभराट पाहायला मिळणार आहे. ज्याला हात लावाल ते सोन अशी परिस्थिती राहणार आहे. करियर आणि व्यवसायाशी संबंधित गोड बातमी या काळात मिळू शकते. मनातील सुप्त इच्छा या काळात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
चैनीच्या गोष्टींवर या काळात खर्च वाढणार आहे पण असे केल्याने तुम्हाला आत्मिक समाधान मात्र नक्की मिळेल. या आठवड्यात या लोकांना त्यांच्या हितचिंतकाच्या मदतीने एखादे मोठे काम करण्यात यश प्राप्त होणार आहे. तुमच्या जोडीदाराचे देखील नशीब या काळात पूर्णतः चेंज होणार आहे