Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहातील नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे नवग्रहातील नवग्रह बारा राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करत असतात. नवग्रहातील नवग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि याचा सर्वच राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.
जुलै महिन्यातही अनेक ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन झाले आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात देखील नवग्रहातील काही ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहेत तसेच काही ग्रहांच्या चालीमध्ये बदल होईल. 11 ऑगस्ट रोजी देखील अशीच एक घटना घडणार आहे.

ज्योतिष तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे 11 ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणाऱ्या बुध ग्रह मार्गी होणार आहे. बुध ग्रह सध्या कर्क राशीमध्ये विराजमान आहे आणि 11 ऑगस्ट रोजी बुध ग्रह कर्क राशीमध्ये मार्गी होईल आणि याचा राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो.
ह्या राशीच्या लोकांना मिळणार विशेष
कन्या : 11 ऑगस्ट नंतर कन्या राशीच्या लोकांचा वाईट काळ समाप्त होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील या काळात चांगला लाभ मिळणार आहे.
व्यवसायातील अडचणी देखील या काळात दूर होणार आहेत. या राशीच्या लोकांना नवीन इनकम सोर्स सापडणार आहेत आणि त्यामुळे यांचे उत्पन्न वाढेल. एकंदरीत पुढील महिन्यात या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल.
मिथुन : कन्या राशीच्या लोकांप्रमाणेच मिथुन राशीच्या लोकांसाठीही ऑगस्ट महिना लाभाचा ठरणार आहे. या काळात या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील जुन्या अडचणी दूर होणार आहेत.
या लोकांना आपापल्या क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे. नातेवाईकांसोबतची बॉण्डिंग चांगली राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मोठा अनुकूल राहील आणि विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
मेष : मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांप्रमाणेच मेष राशीच्या लोकांचाही वाईट काळ लवकर समाप्त होणार आहे. 11 ऑगस्ट नंतर या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
जमिनीशी आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये या लोकांना यश मिळणार आहे. कुटुंबात अगदीच आनंदाचे वातावरण राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या लोकांचे संबंध चांगले होतील. वाईट काळ संपला आणि नव्या सुवर्णकाळाची सुरुवात होईल.