Lucky Zodiac Sign : 2025 हे वर्ष काही राशीच्या लोकांसाठी विशेष खास ठरणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी नवग्रहातील बहुतांशी ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकानिश्चित कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत आणि एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत असतात.
दरम्यान जेव्हा केव्हा नवग्रहातील ग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम पाहायला मिळतो. कधी कधी राशी परिवर्तनामुळे मानवी जीवनावर याचा नकारात्मक प्रभाव पडत असतो तर कधी कधी याचा सकारात्मक प्रभाव देखील पाहायला मिळत असतो.

दरम्यान नवग्रहातील महत्त्वाच्या अशा मंगळ ग्रहाचे येत्या काही दिवसांनी राशी परिवर्तन होणार आहे. पंचांगानुसार 28 जुलै 2025 रोजी मंगळ ग्रह कन्या राशि मध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या लोकांसह इतर अन्य राशींच्या लोकांच्या आयुष्यात देखील खोलवर परिणाम पाहायला मिळू शकतो.
या राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार
मकर राशी : 28 जुलै नंतर या राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहेत. या काळात या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसाय व प्रवासाचे योग फारच प्रबळ आहेत.
धार्मिक कार्य आणि समाजात मोठा मान-सन्मान मिळण्याची शक्यता सुद्धा ज्योतिष तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता लवकरच समाप्त होणार आहे.
वृश्चिक : मकर राशीच्या लोकांप्रमाणेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील आगामी काळ मोठ्या लाभाचा ठरणार आहे. मंगळ ग्रहाच्या राशी गोचरमुळे या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नवाढीचे नवीन स्रोत तयार होणार आहेत. आत्तापर्यंत जेवढ्या संकटाचा या लोकांनी सामना केला आहे त्यातून या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
या राशीच्या लोकांना जर काही नवीन काम सुरू करायचे असेल तर हा काळ सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. जे लोक कला क्षेत्रात आहेत त्यांना या काळात विशेष यश मिळण्याचे योग तयार होत असल्याची माहिती समोर आली आहे.
सिंह : वृश्चिक आणि मकर राशि प्रमाणेच सिंह राशीसाठी सुद्धा हा काळ अधिक लाभाचा राहणार आहे. या राशीच्या लोकांचा वाईट काळ सुद्धा समाप्त होणार आहे. मंगळ ग्रहाच्या कन्या राशीतील आगमनामुळे या राशीच्या लोकांना आकस्मिक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे.
जे लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते असे सुद्धा बोलले जात आहे. सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास या काळात अधिक वाढलेला राहणार आहे. या लोकांच्या आयुष्याला या काळात एक नवीन दिशा मिळणार आहे. या काळात नवीन वाहन तसेच नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे योग तयार होणार आहेत.