Maharashtra 10th And 12th Exam Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या संदर्भात नुकतीच मोठी माहिती दिली आहे.
यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2025 चा दहावी व बारावीचा निकाल लवकरच जाहीर करणार हे स्पष्ट झाले असून यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची आतुरता देखील आता संपणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2024 – 25 या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाली होती आणि 18 मार्च 2025 पर्यंत सुरू होती.
दहावीच्या परीक्षेबाबत बोलायचं झालं तर ही एक्झाम 21 फेब्रुवारी 2025 ला सुरू झाली आणि शेवटचा पेपर 17 मार्च 2025 रोजी संपला. राज्यातील लाखो विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसले होते आणि आता हे लाखो विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत.
10वी अन 12वी चा निकाल कधी लागणार?
महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावीचा निकाल पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. 15 मे 2025 पर्यंत दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो अशी माहिती राज्य बोर्डाच्या अध्यक्षांकडून देण्यात आली आहे.
दुसरीकडे, काही ठिकाणी बारावीचा निकाल 15 मे ला तर दहावीचा निकाल एक ते तीन जून दरम्यान जाहीर होऊ शकतो असे बोलले जात आहे.
आधी बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल असे म्हटले जात आहे. यामुळे नेमका दहावी आणि बारावीचा निकाल कधीपर्यंत लागणार हे पाहणे खरंच उत्सुकतेचे ठरणार आहे.
निकाल कुठं पाहणार ?
दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in, mahahsscboard.in, msbshse.co.in व hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा आपला सीट नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. तसेच एसएमएसद्वारे सुद्धा दहावी आणि बारावीचा निकाल पाहता येणार आहे. दहावीसाठी MHSSC आणि बारावीसाठी MHHSC लिहून 57766 या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे.