Maharashtra 10th And 12th Exam Timetable : दहावी आणि बारावी हे करिअरच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वाचे टप्पे. यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांकडे विद्यार्थ्यांसहित पालकांचे विशेष लक्ष असते.
दरम्यान यावर्षी दहावी आणि बारावीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाने दहावी आणि बारावीचे वेळापत्रक फायनल केले असल्याची माहिती हाती आली आहे.

पण, बोर्डाने निश्चित केलेले अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येवू शकतो का? याबाबत निवडणूक आयोगाकडे बोर्डाकडून विचारणा करण्यात आली आहे.
दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांनी दहावी आणि बारावी बोर्डाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
पण जर निवडणूक आयोगाने परवानगी दिली नाही तर हे वेळापत्रक निवडणुकीनंतरच जाहीर होणार आहे. दरम्यान यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेआधीच होणार आहेत.
नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याचा मानस बोर्डाने व्यक्त केला आहे. तसेच बोर्ड परीक्षापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल म्हणजेच प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी दहावी बोर्डाच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात घेतल्या जाणार असून त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार असून ही परीक्षा तीन ते 20 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे.
बारावी बोर्ड परीक्षा बाबत बोलायचं झालं तर यंदा बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात होतील आणि बोर्डाच्या लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात घेतल्या जाणार आहेत.
यावर्षी परीक्षा लवकर होणार असल्याने निकालही लवकरच लागेल. यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दहा ते पंधरा दिवस लवकर लागू शकतो असा एक अंदाज समोर येत आहे. परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळणार आहे तसेच पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेश योग्य वेळेत मिळणार आहे.
खरे तर यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक अंतिम झाले आहे, पण हे वेळापत्रक जाहीर करताना आचारसंहितेचा काही अडसर तर येत नाही ना याचबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेतले जात आहे.
यामुळे आचारसंहितेचा अडसर आला नाही तर येत्या काही दिवसात दहावी आणि बारावी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. अन्यथा निवडणूक निकाल लागल्यानंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर नंतर या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.