दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !

Published on -

Maharashtra 10th And 12th Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही दहावी किंवा बारावीच्या वर्गात असाल आणि बोर्ड परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरे तर सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहे. यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या व्यस्त आहेत. अशातच आता दहावी आणि बारावीच्या रिजल्ट बाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.

काय आहेत डिटेल्स?

यंदा महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीचा पेपर लवकर घेण्यात आला आहे. यंदाच्या दोन्ही वर्गांच्या परीक्षा नेहमीपेक्षा जवळपास 10 दिवस अगोदर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच यावर्षी दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल सुद्धा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार दहावी आणि बारावीचा निकाल हा 15 मे 2025 पूर्वीचं जाहीर केला जाणार आहे. दहावी आणि बारावीचा निकाल यंदा वेळेच्या आधी जाहीर व्हावा यासाठी संबंधितांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दररोज बोर्डाचे अधिकारी आढावा घेत आहेत.

अजून बारावीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाचा पेपर राहिला असून दहावीच्या विद्यार्थ्यांचेही दोन पेपर बाकी आहेत. 17 मार्च रोजी बोर्डाची परीक्षा संपणार आहे. मात्र, ज्या विषयांचे पेपर झाले आहेत, त्यांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी युद्ध पातळीवर सुरू आहे.

उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी, यासाठी दररोज शाळेच्या वेळेत विषय शिक्षकाने किमान 35 उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे सुद्धा बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा निकाल हा वेळेच्या आधीच लागणार आहे.

गेल्या वेळी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता यावेळी मात्र तशी परिस्थिती नाहीये. यामुळे यंदाचा दहावी आणि बारावीचा रिझल्ट हा 15 मे 2025 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत लागणारच असे बोर्डातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe