10वी आणि 12वी चा निकाल केव्हा लागणार ? समोर आली नवीन तारीख

महाराष्ट्रातील राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची अपडेट हाती आले आहे. दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.

Published on -

Maharashtra Board 10th And 12th Result : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. MSBSHSE म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी अन 12वी चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.

खरे तर दहावी आणि बारावी बोर्डाच्या एक्झाम झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? हाच मोठा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याच बाबत एक नवं अपडेट हाती आलं आहे.

केव्हा लागणार 10वी अन 12वी चा निकाल ?

मिळालेल्या माहितीनुसार, 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीचा इयत्ता 12वीचा निकाल मे 2025 च्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल लागला की मग त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान, दहावीच्या निकालाबाबत बोलायचं झालं तर इयत्ता दहावीचा बोर्ड निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांची उत्सुकता आता आणखीच शिगेला पोहोचली आहे.

दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर होत असतो. यंदाही मे महिन्यातच हा निकाल लागणार असे दिसते. महत्त्वाचे म्हणजे सालाबादापेक्षा यंदाचा निकाल हा लवकरच लागण्याची शक्यता आहे.

कुठं पाहणार निकाल?

दहावीचा अन बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. दरम्यान दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक पाहायला मिळते.

वेबसाईटवर होणाऱ्या ट्रॅफिक मुळे निकाल लवकर समजतं नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालक हैराण होतात. पण आता वेबसाइटवर वाढणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करता, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात फारशी अडचण जाणवणार नसल्याचे बोलले जात आहे. वेबसाइट नियमित लोड टेस्टिंगद्वारे तपासण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच, आयटी विभागाला सात दिवसांत तपशीलवार सुरक्षा अहवाल सादर करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आले आहेत.

मागील वर्षीच्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी हे पावले उचलण्यात आली आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर रोल नंबरच्या साहाय्याने त्यांचा निकाल पाहू शकतील. पण आता निकालाच्या या अशा तयारीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News