विद्यार्थी अन पालकांसाठी महत्त्वाची बातमी! 18 नोव्हेंबर पासून ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी राहणार, कारण काय ?

विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे अनेक शाळांना शाळा चालविणे अशक्य आहे. म्हणून 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला ज्या शाळांना इलेक्शन ड्युटी मुळे शाळा भरवणे कठीण आहे, त्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Breaking News : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारात दंग आहेत. मतदानासाठी आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त चार दिवसांचा काळ शिल्लक असून या शेवटच्या टप्प्यात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. देशपातळीवरील अनेक दिग्गज नेते देखील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सक्रिय झाले असून सर्वत्र प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे.

भारतीय निवडणूक आयोग देखील निवडणुकांसाठी तयारीला लागले आहे. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तसेच मतदानाच्या प्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसात म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, आजपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच, आता राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांबाबत अन शाळांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील शिक्षकांना विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्शन ड्युटी दिली जाणार आहे. यासाठी त्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. म्हणजे आता राज्यातील बहुतांशी शिक्षकांना इलेक्शन ड्युटी दिली जाणार आहे.

या अनुषंगाने राज्यातील शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर केली जावी अशी मागणी उपस्थित केली जात होती. शिक्षक संघटनांच्या याच मागणीवर आता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील शाळांना 18 ते 20 नोव्हेंबर हे तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे अनेक शाळांना शाळा चालविणे अशक्य आहे.

म्हणून 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला ज्या शाळांना इलेक्शन ड्युटी मुळे शाळा भरवणे कठीण आहे, त्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षकांच्या इलेक्शन ड्युटी मुळे ज्या शाळांना शाळा भरवणे अशक्य आहे त्या शाळांमधील संबंधित मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना देण्याच्या राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना विनंती पत्राद्वारे देण्यात आलं आहे.

म्हणजे इलेक्शन ड्युटी मुळे शिक्षक उपलब्ध नसणे तसेच अनेक गावांमध्ये शाळेतच मतदानाची प्रक्रिया होणार असल्याने 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी शाळांना सुट्टी जाहीर होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe