पुणे ते सातारा प्रवास होणार वेगवान ! ‘या’ घाटातील 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात, वाचा सविस्तर

Published on -

Maharashtra Breaking : पुणेकरांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असणारे खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ह्याच घाटात अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

काही प्रसंगी या घाटात प्रवास करण्यासाठी जवळपास 30 ते 45 मिनिटांचा वेळ लागतो. पण लवकरच या घाटातील प्रवास वेगवान होणार आहे. यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

तयार होणार दोन टनेल 

पुणे – सातारा महामार्गावर एस आकाराच्या वळणाचा खंबाटकी घाट रस्ता आहे. त्यामुळे या घाटातून प्रवास करणे फारच आव्हानात्मक आहे. मात्र आता या घाटात दोन बोगदे तयार केले जात आहेत. पुण्याच्या दिशेने आणि साताराच्या दिशेने दोन बोगदे या घाटात तयार होणार आहेत.

या बोगद्यांचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू असून या बोगद्याच्या प्रत्येक दिशेला तीन लेन आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यातील एक बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. काल शनिवारपासून हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

मागील सहा वर्षांपासून सुरू असणाऱ्या या प्रकल्पाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान ज्या बोगद्याचे काम पूर्ण झाले होते तो बोगदा आता वाहतुकीसाठी सुरू झालाय.

साताराहून पुण्याच्या दिशेने जाणारा बोगदा 17 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू झाला असल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळत आहे. या बोगद्याच्या उतारा जवळ दरी पुलाचे काम सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या बोगद्यातून सध्या स्थितीला फक्त हलक्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा जड वाहने देखील यावरून प्रवास करू शकणार आहेत. 

प्रवासाचा वेळ वाचणार ! 

दोन्ही बोगद्याचे पूर्ण काम झाल्यानंतर खंबाटकी घाटातील प्रवास 20 मिनिटे लवकर होणार आहे. गर्दीच्या वेळी खंबाटकी घाटात 45 मिनिट प्रवास करावा लागतो. मात्र बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास दहा ते पंधरा मिनिटांवर येणार आहे.

खंबाटकी घाटातील तीव्र वळण अनेकदा अपघाताचे प्रमुख कारण बनते. शिवाय काही ठिकाणी घाट रस्ता दुहेरी आहे. यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी पण पाहायला मिळते. यात सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खंबाटकी घाटात दोन बोगदे तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले पण कोरोना काळात काम थांबले होते. पण या प्रकल्पाच्या कामासाठी मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रकल्पातील डाव्या बाजूचा बोगदा तेराशे मीटर लांबीचा आहे आणि उजव्या बाजूचा बोगदा 1224 मीटर लांबीचा आहे.

पुण्याच्या दिशेने बोगदा संपल्यानंतर दरी पूल बांधला जातोय आणि याचेही काम जवळपास 14 – 15 टक्के झाले आहे. दरम्यान शनिवारी यातील एका बोगद्यात चाचणी घेण्यात आली असून संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा घाट रस्ता हा इतिहास जमा केला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe