Maharashtra CM Payment : सोमवारपासून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी अधिवेशन राजधानी मुंबईत सुरु झाले. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानभवनातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवप्रभुंना अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी सुद्धा शिवरायांना अभिवादन केले. पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली असल्याने महायुती सरकारचे सर्व मंत्री, तसेच सर्वच पक्षांचे आमदार सध्या मुंबईत ठाण मांडून आहेत.

या अशा परिस्थितीतच मात्र आमदारांना तसेच मंत्र्यांना असणारे हक्क त्यांचा पगार या सर्व गोष्टी देखील चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान आज आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पगाराची माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना वार्षिक किती पगार मिळतो, पगाराव्यतिरिक्त त्यांना कोण कोणते भत्ते मिळतात, सोबतच देशातील कोणत्या राज्यातील मुख्यमंत्री सर्वाधिक पगार घेतात याच बाबतचे सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो ?
देशात एकूण 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. मात्र प्रत्येक राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांना मिळणारे वेतन हे वेगवेगळे आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांबाबत बोलायचं झालं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सध्या स्थितीला तीन लाख 40 हजार रुपये एवढे वेतन दिले जात आहे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्या तीन लाख 40 हजार रुपये प्रति महिना एवढं वेतन मिळत आहे.
म्हणजेच त्यांना 40 लाख 80 हजार रुपये वार्षिक पगार सरकारी तिजोरीतून दिला जात आहे. यासोबतच त्यांना वेगवेगळे भत्ते सुद्धा दिले जातात. मुख्यमंत्र्यांच्या PA म्हणजेच सहाय्यकासाठी दरमहिन्याला 25 हजार रुपये दिले जातात.
मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि इतर जबाबदाऱ्या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी इतर विविध भत्तेही दिले जात असतात. मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकृत खर्च भागवण्यासाठी वार्षिक 10 लाख रुपयांचा अतिरिक्त भत्ता सुद्धा मिळू शकतो.
तसेच राज्यातील आमदारांना दर महिन्याला 2 लाख 32 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 27 लाख 84 हजार रुपये इतका पगार मिळतो. ही रक्कम सर्व मंत्र्यांसाठी सारखीच असते. मग ते मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, कॅबिनेट मंत्री असो किंवा राज्यमंत्री असोत साऱ्यांना सारखाच पगार मिळतो.
कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो सर्वाधिक पगार?
खरंतर महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांच्या यादीत येते. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. पण असे असतानाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मिळणारा पगार इतर काही राज्यांपेक्षा कमी आहे.
सर्वाधिक पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा चौथा नंबर लागतो. रिपोर्टनुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री सर्वाधिक पगार घेतात. त्यांना दरमहा चार लाख वीस हजार रुपये एवढा पगार दिला जात आहे.
या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री दुसऱ्या स्थानी येतात आणि तिसऱ्या स्थानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येतात. यूपीच्या मुख्यमंत्र्यांना सध्या तीन लाख 75 हजार रुपये प्रति महिना एवढा पगार दिला जातोय.