Maharashtra Employee News : पुढील महिन्यात दिवाळी येतेय. आता साऱ्यांना दिवाळीची ओढ लागलीय. सरकारी कर्मचारी मात्र आतुरतेने याची वाट पाहतायेत कारण त्यांना दिवाळीत बोनस पण मिळणार आहे.
अद्याप महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची घोषणा केलेली नाही. पण, त्याआधीच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.

यानुसार आता महापालिका निवडणुकांच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना देखील मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील निवडणुका पाहता यावेळी महापालिकेच्या कामगारांना वाढीव दिवाळी बोनस दिला जाणार आहे. यावेळी दिवाळी बोनसची रक्कम 500 ते 1000 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे.
दुसरीकडे कामगार संघटनांनी यावेळी बोनसची रक्कम 20 टक्क्यांनी वाढवावी अशी मागणी उपस्थित केली आहे. अर्थात यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सरासरी 66 हजार रुपयांचा बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दि म्युनिसिपल युनियनकडून ही मागणी उपस्थित करण्यात आली आहे. पण एवढा मोठा बोनस महापालिका प्रशासन देणार नाही. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बोनसची रक्कम अधिक राहणार आहे मात्र इतकी मोठी रक्कम महापालिका प्रशासन देण्यास तयार होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षी जेवढी रक्कम देण्यात आली होती त्यापेक्षा 500 ते 1000 रुपये रक्कम अधिक देण्यात येईल. गेल्या वर्षी दिवाळी बोनस म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपये देण्यात आले होते.
यंदा यामध्ये जास्तीत जास्त एक हजार रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजेच या वर्षी दिवाळी बोनस म्हणून 30 हजार रुपये देण्यात येतील असा अंदाज आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाटाघाटी करून बोनसची रक्कम ठरवण्यात येणार आहे.
याची वाटाघाटी नवरात्र उत्सवानंतर होणार आहे. कर्मचारी संघटना व प्रशासनात बोनस संदर्भात वाटाघाटी करण्यात येईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात येणार आहे.
कामगार संघटना यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के वाढीव बोनस देण्यात यावा अशी मागणी करत आहेत. यामुळे आता कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडून किती बोनस जाहीर केला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.