मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे

Published on -

Maharashtra Express Highway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वाची बातमी दिली आहे. राज्याला भविष्यात आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती देताना मुंबई लातूर एक्सप्रेस वे प्रकल्पाची पण माहिती दिली.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते हैदराबाद या दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खरेतर, मुंबईहून लातूरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान या दोन्ही महानगर दरम्यान प्रवास करणाऱ्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्राला लवकरच एक नवीन जनकल्याण द्रुतगती महामार्ग मिळणार असून, या महामार्गामुळे मुंबई ते लातूर हा प्रवास अवघ्या साडेचार तासांत पूर्ण करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई–कल्याण–लातूर–हैदराबाद असा एक नवा जनकल्याण द्रुतगती महामार्ग आम्ही विकसित करत आहोत. सध्या मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग उपलब्ध आहेत.

समृद्धी महामार्गाने जालना–नांदेड–निजामाबाद मार्गे गेल्यास सुमारे ७१७ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, तर मुंबई–पुणे–सोलापूर मार्गे गेल्यास हे अंतर सुमारे ७०७ किलोमीटर आहे. मात्र, प्रस्तावित नवीन द्रुतगती महामार्गामुळे हे अंतर थेट ५९० किलोमीटरवर येणार आहे.

या महामार्गाचा सर्वात मोठा फायदा मराठवाड्याला, विशेषतः लातूर, उस्मानाबाद (धाराशिव), बीड आणि नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मुंबई आणि लातूरमधील प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य सेवांना चालना मिळेल.

शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी हा महामार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नवीन द्रुतगती महामार्गामुळे केवळ मुंबई ते लातूरच नव्हे, तर थेट हैदराबादपर्यंतचा प्रवासही अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील.

मालवाहतूक सुलभ झाल्याने लॉजिस्टिक्स खर्चातही मोठी बचत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा महामार्ग जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, तो आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची सुरक्षितता आणि वेगवान वाहतुकीचा विचार करून उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला नवे पंख मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. थोडक्यात, मुंबई–लातूर–हैदराबाद द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल घडवून आणणारा प्रकल्प ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News