Maharashtra Expressway : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. महाराष्ट्रातील बीजेपीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत आता महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
याच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. खरंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला शक्तिपीठ महामार्ग विरोधातील शेतकऱ्यांची नाराजी देखील जड भरली होती.
यामुळे या प्रकल्पासंदर्भात शिंदे सरकारने सावध भूमिका घेतली आहे. हा महामार्ग प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या महामार्गाला बाधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग रद्द केला जाईल अशी घोषणा आज केली आहे.
खरेतर हा प्रकल्प महायुती सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र हा महामार्ग प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
हेच कारण आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने या महामार्ग प्रकल्पासाठी सुरू करण्यात आलेली भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भूसंपादनाची प्रक्रिया रद्द झाल्यानंतरही या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा महामार्ग प्रकल्प थेट रद्द व्हावा यासाठी आंदोलनाचे सत्र सुरू होते.
दरम्यान आता या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर आणि विरोधानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे. या महामार्गासाठी 27 हजार हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार होते. मात्र आता हा प्रकल्प रद्द होणार अशी घोषणा करण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील एका जाहीर सभेत शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो, नको असणारा प्रकल्प तुमच्यावर लादणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यामुळे आता या महामार्गविरोधात शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आंदोलन थांबेल असे दिसत आहे.