नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ गावांमध्ये पूर्ण झाली मोजणी

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत नवीन माहिती हाती आली आहे. हा महामार्ग ज्या गावांमधून जाणार आहे त्या गावांमध्ये संयुक्त मोजणी सुरू करण्यात आली आहे. 

Published on -

Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्राला शक्तीपीठ महामार्गाची भेट मिळणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील तीन प्रमुख शक्तीपिठांना आणि अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे.

हा महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा राहणार असून राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे. दरम्यान याच शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी काही गावांमध्ये संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

या गावांमध्ये संयुक्त मोजणी झाली पूर्ण 

वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत नवा शक्तिपीठ महामार्ग विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधील 39 तालुक्यातील तब्बल 370 गावांच्या हद्दीतून जाणार आहे.

दरम्यान आता महामंडळाकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या संयुक्त मोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संयुक्त मोजणी प्रक्रियेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प ज्या 370 गावांमधून जाणार आहे त्यापैकी 110 गावांमध्ये महामंडळाकडून संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. 

मोजणीचे काम कधीपर्यंत होणार ? 

शक्तीपीठ महामार्ग एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार असून हा 802 किलोमीटर लांबीचा महामार्ग राज्यातील 370 गावांमधून जाणार असल्याने या प्रकल्पासाठीचे भूसंपादन मोठे आव्हानात्मक राहणार आहे.

खरंतर शक्तीपीठ महामार्गासारख्या विशाल प्रकल्पात प्रत्येक जमिनीची मोजणी आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी प्रशासनाला अधिक वेळ लागत असतो तसेच अधिक मनुष्यबळही लागत असते.

या प्रकल्पासाठीचे भूसंपादन आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असून चक्क 110 गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाने सप्टेंबर अखेरपर्यंत हा महामार्ग ज्या 370 गावांमधून जाणार आहे त्या गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

दरम्यान या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित जमिनींचे प्रत्यक्ष हस्तांतर आणि संबंधित जमीन मालकांना मोबदल्याचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर मग या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणि निविदा पूर्ण झाल्यानंतर मग या प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!