शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात मोठा बदल ! मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला नवा मार्ग, कोणत्या गावातून जाणार?

Published on -

Maharashtra Expressway : दोन वर्षांपूर्वी अर्थातच 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला मोठा फटका बसला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या जागा कमी झाल्यात. कारण ठरले शक्तिपीठ महामार्ग. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर सहित अन्य काही भागात मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता.

यामुळे सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात आला असल्याची घोषणा केली. पुढे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आणि पुन्हा शक्तिपीठ महामार्गाला महायुतीकडून मंजुरी मिळाली.

मात्र यावेळी फडणवीस सरकारने प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याचा नवा लेआउट सुद्धा समोर आला आहे.

शक्तिपीठ महामार्ग नागपूर आणि गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास वेगवान करणार आहे. यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास वेगवान होईलच शिवाय राज्यातील विविध तीर्थक्षेत्र या महामार्गाने कनेक्ट होणार आहेत.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावित महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये बदल करण्यात आला असल्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत आता आपण शक्तीपीठ महामार्गाचे नवीन अलाइनमेंट कसे आहे आता हा महामार्ग कोणत्या भागांमधून जाणार याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

 शक्तीपीठ महामार्गाचा रूट कसा असणार ?

 नव्या अलाइनमेंट मुळे शक्तिपीठ महामार्गाची लांबी आणखी वाढणार आहे. सुरुवातीला शक्तिपीठ महामार्ग साधारणतः 800 km लांबीचा राहणार असे सांगितले गेले होते.

मात्र आता याची लांबी जवळपास 40 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच शक्तिपीठ मार्ग मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गापेक्षा चाळीस किलोमीटर लांब राहणार आहे.

शक्तिपीठ महामार्ग राज्यातील तीन महत्त्वाच्या शक्तिपीठांना थेट कनेक्ट करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र सप्तशृंगी देवीचे अर्धशक्तीपीठ वगळता राज्यातील इतर तीन शक्तीपीठ यामुळे कनेक्ट होणार आहेत.

तुळजापूर , कोल्हापूर आणि माहूर या तीन शक्तिपीठांना हा महामार्ग थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार असून यामुळे शक्तीपीठ दर्शनाला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आता या महामार्गाचे आरेखन बदलले आहे आणि नव्या आरेखनानुसार आता हा महामार्ग सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांतून जाईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

सांगली-कोल्हापूर दरम्यान हा मार्ग भुदरगड तालुक्यातून आजरा, चंदगडमार्गे बांदा येथे जाणार असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या महामार्गाच्या आरेखनात बदल करण्यात आला असला तरी सुद्धा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी याचा विरोध केला आहे.

या महामार्ग प्रकल्पातून 60000 कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्यामुळेच आता सरकारला त्याच्या आरेखनात बदल करावा लागत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. यामुळे आता शक्तीपीठ महामार्गाबाबत पुढे नेमकं काय होतं हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News