Maharashtra Expressway : सध्या केंद्रीय विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील सरकारकडून आतापर्यंत भारतात 63 लाख किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क तयार झालेले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क तयार झालेले आहे आणि महाराष्ट्र हे राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर आहे. विशेष म्हणजे राज्यातील रस्त्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस विस्तारत आहे. भविष्यात राज्याला आणखी एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे.

हा नवा एक्सप्रेस वे नागपूर ते गोवा दरम्यान विकसित केला जाईल. हा महामार्ग पूर्णपणे प्रवेश नियंत्रित राहणार आहे. या महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होणार आहे आणि या महामार्गाची एंडिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे होईल.
या नव्या प्रस्तावित महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार असून या प्रकल्पामुळे फक्त दळणवळणच सुलभ होणार नाही तर धार्मिक पर्यटनाला सुद्धा चालला मिळणार आहे कारण की हा प्रकल्प राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना कनेक्टिव्हिटी देणार आहे.
किती जमीन भूसंपादित होणार?
नागपूर गोवा महामार्ग प्रकल्पाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. कारण म्हणजे हा प्रकल्प राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार आहे. कोल्हापूर तुळजापूर आणि माहूर हे तीन शक्तीपीठ या महामार्गामुळे एकमेकांना जोडले जाणार आहेत. या महामार्गाची एकूण लांबी 802 किलोमीटर इतकी राहील.
हा मार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधील 39 तालुक्यामधून जाणार आहे. यासाठी राज्यातील 371 गावांमधील 8615 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सर्वात कमी जमीन सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूसंपादित केली जाणार आहे आणि सर्वात जास्त जमीन सोलापूर जिल्ह्यात संपादित केली जाणार आहे.
राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार हा नवा मार्ग?
हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या चार विभागांना जोडेल. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग असा राहणार आहे.
या संबंधित जिल्ह्यांमधील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांना या महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासाला आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती जमीन संपादित होणार?
सिंधुदुर्ग – 399 हेक्टर
नांदेड – 387 हेक्टर
बीड – 411 हेक्टर
लातूर – 414 हेक्टर
वर्धा – 435 हेक्टर
हिंगोली – 430 हेक्टर
धाराशिव – 461 हेक्टर
सांगली – 556 हेक्टर
परभणी – 742 हेक्टर
कोल्हापूर – 1262 हेक्टर
यवतमाळ – 1423 हेक्टर
सोलापूर – 1689 हेक्टर