Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांपासून भारतात अनेक महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातही हजारो किलोमीटर लांबीचा रस्त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात राज्यात अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. सर्वाधिक चर्चेच्या समृद्धी महामार्गाचे काम देखील येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे.
पण आज आपण देशातील सर्वात महागड्या महामार्गाची चर्चा करणार आहोत. देशातील सर्वात महागडा महामार्ग सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच आहे. या महामार्गावर प्रवास करणे सर्वात महाग आहे. या महामार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना इतर महामार्गांपेक्षा अधिकचा टोल द्यावा लागतो.

कोणता आहे तो महामार्ग
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात महागडा महामार्ग म्हणून ओळखला जातो. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी या दरम्यान विकसित करण्यात आलेल्या या महामार्गामुळे पुणे ते मुंबई दरम्यान चा प्रवास वेगवान झाला आहे.
हा भारतातील पहिला सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 94.5 किलोमीटर इतकी आहे. या महामार्गाच्या कामासाठी तब्बल एक लाख 63 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली असून या प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल 22 वर्ष लागले होते.
या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास फक्त साडेतीन तासात पूर्ण होत आहे. नवी मुंबई येथील कळंबोली येथून या महामार्गाची सुरुवात होते आणि पुण्यातील किवळे या ठिकाणी हा महामार्ग संपतो. आता आपण या महामार्गासाठीचे टोल रेट कसे आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.
कसे आहेत टोल रेट?
वाहन चालकांना या महामार्गावरून एका दिशेने प्रवास करण्यासाठी 320 रुपये टोल भरावा लागतो. टेम्पोसाठी एकेरी टोल टॅक्स 495 रुपये आहे. बससाठी 940 रुपये इतका टोल दर आहे. डबल एक्सल ट्रकसाठी 685 रुपये, तीन एक्सल ट्रकसाठी 1,630 रुपये आहे. तर मल्टी एक्सल ट्रकसाठी 2165 रुपये टोल आकारला जातो.