मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गबाबत मोठे अपडेट ! मर्सिडीझ बेंन्ज कंपनीने घेतला ‘हा’ निर्णय, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

Published on -

Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हा महामार्ग प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. समृद्धी महामार्गामुळे दोन्ही शहरांमधला प्रवास फक्त आठ तासात करता येणे शक्य झाले आहे.

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा 2022 मध्ये सुरू झाला होता. यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. आज घडीला मुंबई नागपूर संपूर्ण समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू आहे.

पण या महामार्गावर होणारे अपघात ही चिंतेची बाब बनली आहे. महामार्गावर आधीपासून मोठमोठे अपघात होत आहेत. दरम्यान हीच बाब विचारात घेता आता मर्सिडीज बेंज या कंपनीने मोठा पुढाकार घेतलाय.

कंपनीने समृद्धी महामार्ग दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर त्यांनी एक मोठे आवाहन केले आहे. मर्सिडीज बेंज ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी.

आता या कंपनीने ‘रोड हिप्नोसिस’मुळे होणारे अपघात टाळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पुढील 3 वर्षांसाठी कंपनीने समृद्धी महामार्ग दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

चाकण येथे मर्सिडीज कंपनीला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती दिली. मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आता मर्सिडीज बेंज कंपनी समृद्धी वरील अपघात रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहे.

चालकांना प्रशिक्षण देणे, अपघात प्रवणक्षेत्रावर दिशादर्शक लावणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी तयार करणे आणि अपघात टाळण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करणे असे काही उपक्रम कंपनीकडून राबवले जाणार अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान मर्सिडीज बेंज कंपनीने रस्ता सुरक्षा अभियानात सदर उपक्रमाद्वारे मोलाची भूमिका बजावण्याची तयारी दाखवली असल्याने मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. सरनाईक यांनी कंपनीसोबत ई वाहन धोरण बाबत सुद्धा सखोल चर्चा केली आहे.

यावेळी त्यांनी मर्सिडीज कंपनी भविष्यात इलेक्ट्रिकल व्हेईकल सेगमेंट मध्ये आणखी मोठी प्रगती करणार अशी आशा व्यक्त केली आहे. नक्कीच या उपक्रमामुळे समृद्धी वरील अपघातांची मालिका संपू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe