Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्याला हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाची भेट मिळाली आहे. गत पंधरा-वीस वर्षांचा काळ राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. अशातच आता महाराष्ट्रात आणखी एक नवीन कॉरिडॉर तयार होणार असे संकेत मिळत आहेत.
खरे तर सध्या मुंबई ते नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या महामार्ग प्रकल्पाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे अन हा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे.

समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून या मार्गाचा बाकी राहिलेला 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असे म्हटले जात आहे. दुसरीकडे नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
हा महामार्ग प्रकल्प राज्यातील तीन शक्तीपीठसहित अनेक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र जोडणारा राहणार आहे. अशातच आता राज्याला तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर कॉरिडॉरची भेट मिळू शकते असे संकेत मिळत आहेत.
खरंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पुनर्विकास आणि तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतलाय.
यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत आणि या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत.
यावेळी धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूरसह पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थस्थळांचा समावेश असलेला धार्मिक कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
म्हणजेच तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर असा एक कॉरिडॉर तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली असून नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेचा शासनाने विचार केला तर हे धार्मिक क्षेत्रे जोडणारा एक कॉरिडोर आगामी काळात आपल्याला पाहायला मिळू शकतो. नक्कीच राज्यात हा कॉरिडोर तयार झाला तर भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
त्यामुळे भाविकांना जलद गतीने दर्शनाची सोय उपलब्ध होईल. अशा प्रकारचा कॉरिडोर आपल्या महाराष्ट्रात तयार झाला तर यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. धार्मिक पर्यटना सोबतच संबंधित जिल्ह्यांमधील कृषी शिक्षण उद्योग या क्षेत्राला देखील याचा मोठा फायदा होणार आहे.