महाराष्ट्रातील ‘हा’ महामार्ग दहापदरी बनवला जाणार ! सरकारचा मेगाप्लॅन पाहून नागरिक झालेत खुश

Published on -

Maharashtra Expressway News : महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीच्या माध्यमातून लवकरच राज्यातील एका महत्त्वाच्या महामार्गाचा चेहरा-मोहरा बदलला जाणार आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण महामार्ग आता दहा पदरी बनवला जाणार आहे.

यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होईल अशी आशा आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा महामार्ग आता दहा पदरी बनवला जाणारा असून या अनुषंगाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयारी सुरु झाली आहे.

हा महामार्ग 2030 पर्यंत 10 लेनचा सुपर हायवे बनवला जाईल अशी माहिती समोर येत आहे. या महामार्गावर वाढणाऱ्या वाहनांची संख्या होणारी वाहतूक कोंडी आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन महामंडळाकडून हा महामार्ग 10 पदरी बनवण्याचा निर्णय झाला आहे.

खरे तर आधी हा महामार्ग आठ पदरी बनवण्याची योजना होती मात्र आता हा महामार्ग 10 पदरी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या अनुषंगाने योग्य ती कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मात्र या निर्णयाचा फटका म्हणून 1420 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.

या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च 14,260 कोटी रुपये असेल. अद्याप या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही पण 2026 मध्ये याचे काम सुरू होईल आणि साधारणतः त्यातून पुढे चार वर्षांनी म्हणजे 2030 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा आहे. प्रकल्पाचे काम हायब्रीड Annuity मॉडेल अंतर्गत पूर्ण केले जाणार आहे.

या प्रकल्पासाठी 40% निधी सरकारकडून उभारला जाणार आहे आणि उर्वरित 60 टक्के निधी खाजगी विकासकांकडून उभारला जाईल. हायब्रीड Annuity मॉडेलने या महामार्गाचा विस्तार केला जाणार असल्याने याचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होतोय.

हा महामार्ग 94.6 किलोमीटर लांबीचा असून सध्या या महामार्गावरील 13 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लींक प्रकल्पाचे काम सुरु आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे आणि येत्या काही दिवसांनी हे काम पूर्ण होईल अशी आशा आहे. या महामार्गावर जो टोल वसूल केला जातोय त्याचा करार 2045 पर्यंत व्हॅलिड आहे.

मात्र हा महामार्ग 10 पदरी बनवला तर हा करार आणखी पुढे वाढवला जाणार आहे. दरम्यान या विस्तारामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास सुपरफास्ट होणार असून दोन्ही प्रमुख महानगरांच्या विकासाला यामुळे आणखी गती मिळणार आहे. दैनंदिन कामानिमित्ताने मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांना या महामार्गाचा सर्वाधिक लाभ मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News