महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महामार्गाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार ! उद्योग मंत्री उदय सामंत यांची मोठी माहिती

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प देखील असाच एक प्रकल्प आहे. या महामार्गाचे काम एका दशकाहून अधिक काळापासून सुरू आहे. याचे काम एक 2012 पासून सुरू असून आता जवळपास 12 वर्ष झाली तेव्हापासून याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. वेगवेगळ्या तांत्रिक बाबींमुळे या महामार्ग प्रकल्पाचे काम रखडले आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाचे शेकडो प्रकल्प पूर्ण झालेत. अनेक मोठमोठ्या महामार्गांची कामे गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही रस्ते महामार्ग प्रकल्प मोठी असूनही रेकॉर्ड टाईम मध्ये पूर्ण झाली आहेत.

असाच एक प्रकल्प आहे समृद्धी महामार्गाचा. मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत या मार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून जेवढे काम पूर्ण झाले आहे त्यावर वाहतूक देखील सुरू आहे.

उर्वरित 76 किलोमीटरचे काम सुद्धा लवकरच पूर्ण होईल अन हा भाग देखील लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र, असेही काही रस्ते महामार्ग प्रकल्प आहेत ज्यांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून अजूनही पूर्ण झालेली नाहीत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प देखील असाच एक प्रकल्प आहे. या महामार्गाचे काम एका दशकाहून अधिक काळापासून सुरू आहे. याचे काम एक 2012 पासून सुरू असून आता जवळपास 12 वर्ष झाली तेव्हापासून याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही.

वेगवेगळ्या तांत्रिक बाबींमुळे या महामार्ग प्रकल्पाचे काम रखडले आहे. दरम्यान आता या महामार्ग प्रकल्पासाठी एक नवीन डेडलाईन समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि तदनंतर यावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरु होणार आहे. यामुळे मुंबई ते गोवा प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे.

पण, नुकत्याच काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकल्पासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार असे म्हटले होते. यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प नेमका कधी सुरू होणार हा प्रश्न अजूनही कायमच आहे.

पण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे. उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई-गोवा महामार्ग हा ‘बीओटी’ तत्त्वावर बांधला जाणार होता.

मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर या महामार्गासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा मार्ग रखडलाय. पण आता लवकरच हा महामार्ग प्रकल्प पूर्ण होईल आणि सर्वसामान्यांसाठी खुला होईल असे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe