Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तसेच काही प्रकल्पांचे कामे अजूनही सुरूच आहेत. मुंबई ते नागपूर यांना जोडणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही.
या महामार्ग प्रकल्पाचा इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम अजून सुरू असून लवकरच हा देखील टप्पा सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. याशिवाय राज्यात नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

याशिवाय अनेक छोटे-मोठे महामार्ग आपल्या महाराष्ट्रात आगामी काळात तयार होणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महाराष्ट्रात तब्बल आठ नवीन एक्सप्रेस तयार केले जाणार आहेत.
खरे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांचा नुकताच आढावा घेतला आहे. यामध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आगामी काळात आठ नवीन एक्सप्रेस वे चे काम पूर्ण केले जाणार असल्याचे समोर आले आहे.
यामुळे आता आपण आपल्या महाराष्ट्रात कोणकोणत्या नव्या महामार्गांची निर्मिती करण्यात येणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यात तयार होणार हे आठ नवे महामार्ग
मीडिया रिपोर्टनुसार, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सध्या महाराष्ट्रात आठ नवीन महामार्ग प्रस्थापित करण्यात आले आहेत. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग, मल्टीमॉडेल कॉरिडॉर, नागपूर ते गोंदिया एक्सप्रेस वे,
नागपूर ते चंद्रपूर एक्सप्रेस वे, भंडारा गडचिरोली एक्सप्रेस वे, वाढवन-नाशिक एक्सप्रेस वे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा विस्तार तसेच भिवंडी ते कल्याण दरम्यानचा उन्नत मार्ग असे अनेक प्रकल्प सध्या प्रस्तावित आहेत.
दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जे रस्ते विकासाचे प्रकल्प प्रस्तावित आहे त्यांना गती मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या संबंधित रस्ते विकासाच्या प्रकल्पांना आवश्यक निधीची तात्काळ उभारणी करण्यात यावी, हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशा सूचना दिलेल्या आहेत.
फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांचा खर्च होणार आहेत. मात्र, असे असले तरी कोणताही प्रकल्प मागे ठेवू नका सर्व प्रकल्प पूर्ण करा अशी सूचना फडणवीस यांनी दिली आहे.
सर्व प्रकल्प हाती घ्यायचे आहेत, शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पाला देखील गती द्या अशा सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाला फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नवनव्या महामार्गाच्या उभारणीला सुरुवात होणार असे दिसते.