Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या राज्यातही अनेक मोठमोठे रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत तसेच काही रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत. मुंबई-दिल्ली महामार्ग प्रकल्प देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्ली यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे.
सध्या या महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यांनी हा महामार्ग प्रकल्प सर्वसामान्यांच्या सेवेत येणार आहे. सध्या मुंबई ते दिल्लीदरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना 24 तासांचा वेळ लागतोय मात्र जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास कालावधी निम्म्याने कमी होईल. हा महामार्ग 1350 किलोमीटर लांबीचा असून या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त बारा तासात पूर्ण केला जाईल असा दावा होतोय.

हा महामार्ग प्रकल्प राजस्थानातून जाणार असून येथील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पातून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रस्ता व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या ठिकाणी एक मोठा बोगदा देखील तयार केला जाणार आहे. भारतातील सर्वात लांब बोगदा या एक्सप्रेस वे वर तयार होणार आहे.
या बोगद्यामध्ये आठ लेन असणार आहेत जे की दोन ट्यूब मध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे एका ट्यूब मध्ये चार लेन असतील. या बोगदा प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा बोगदा जवळपास पाच किलोमीटर लांबीचा आहे. यातील 3.3 किलोमीटर पर्यंतचा भाग हा अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत आहे.
तर या बोगद्याचा बाकी असणारा काही भाग कट अँड कव्हर पद्धतीने बांधण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार या बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर 2025 पर्यंत याचे काम पूर्ण होईल अशी आशा आहे. हा बोगदा अनेक मॉडर्न तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आला आहे तसेच या बोगद्यात अनेक मॉडर्न तंत्रज्ञान असतील.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथे अनेक हायटेक टेक्नॉलॉजीच पाहायला मिळणार आहेत. यात मॉडर्न लाइट्स आणि सेन्सर्स बसवले आहेत. हे वाहतुकीचे नियंत्रणासाठी लावण्यात आले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे हवा शुद्ध केली जाते.
तसेच एआय देखरेख यंत्रणा बसवली जाणार आहे. यामुळे वाहतूकीवर लक्ष ठेवणे तसेच डेटा कलेक्ट करणे सोपे होणार आहे. एकंदरीत भारतातील हा सर्वाधिक लांबीचा बोगदा मुंबई ते दिल्ली दरम्यान चा प्रवास वेगवान बनवणार आहे. शिवाय हा बोगदा प्रकल्प पूर्णपणे हायटेक राहणार आहे.