Maharashtra Expressway : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नाशिकसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी तर भारतीय हवामान खात्याकडून चक्क रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.
नाशिक समवेतच सातारा आणि कोकणातही पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असून याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सातारा आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा घाटमार्ग प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे.
संध्याकाळी सात वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत हा घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता नागरिकांना या घाट मार्गाने प्रवास करता येणार नाहीये.
आंबेनळी घाट मार्ग बंद राहणार
रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा पोलादपूर आंबेनळी घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा घाट मार्ग संध्याकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत बंद राहणार आहे. कारण म्हणजे या घाटमार्गात जास्तीच्या पावसामुळे तीन वेळा दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
या घाट मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून हा घाट मार्ग सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच जर तुम्ही या घाटातून प्रवास करत असाल तर तुम्हाला आता रात्रीच्या वेळी या घाटातून प्रवास करता येणार नाही.
यामुळे प्रशासनाच्या या निर्णयानुसार तुमच्या प्रवासाचे नियोजन तुम्हाला करावे लागणार आहे. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील वाहतूक आता रात्रीच्या वेळी बंद राहणार आहे.
यामुळे जर तुम्हाला या मार्गावरून प्रवास करायचा असेल तर तुम्ही दिवसा प्रवास करायला हवा. खरंतर गेल्या काही दिवसांपासून या भागात सतत मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे या भागात दरड कोसळण्याची भीती आहे आणि याचमुळे नागरिकांसाठी हा घाट मार्ग रात्रीच्या वेळी बंद करण्यात आला आहे.
घाटात दरड कोसळण्याची भीती पाहता सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा घाट मार्ग रात्रीच्या वेळी बंद करण्याचा संयुक्त निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत हा घाट रात्रीच्या वेळी बंद राहणार असल्याची माहिती जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे.