नाशिक – अक्कलकोट प्रवास आता फक्त 4 तासात ! ह्या महामार्ग प्रकल्पाला मिळाली मोठी प्रशासकीय मंजुरी

राज्याला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. हा महामार्ग भारतातील सर्वाधिक लांबीचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रवेश नियंत्रित महामार्ग राहील. या महामार्गाची राज्यातील लांबी 374 किलोमीटरची राहणार आहे. 

Published on -

Maharashtra Expressway : केंद्रातील सरकारकडून भारतमाला परीयोजनेच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जात आहेत. याच परियोजनेच्या माध्यमातून सुरत ते चेन्नईदरम्यान ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे विकसित केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार असून याच प्रकल्पाच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट हाती आली आहे.

खरंतर हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान आता सुरत चेन्नई महामार्गाच्या महाराष्ट्रातील नाशिक ते अक्कलकोट या सेक्शनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

काय आहे नवीन अपडेट?

सुरत-चेन्नई आर्थिक महामार्गाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक ते अक्कलकोट या अत्यंत महत्त्वाच्या विभागाला सार्वजनिक खाजगी भागीदारी मूल्यांकन समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.

हा सेक्शन 374 किलोमीटर लांबीचा पूर्णपणे एक्सेस कंट्रोल सेक्शन राहणार असून हा सेक्शन देखील महामार्गाच्या इतर सेक्शन प्रमाणेच सहा लेनचा राहील. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पूर्वी या सेक्शनचे हायब्रिड अ‍ॅन्युइटी मॉडेल (HAM) अंतर्गत काम करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र आता सरकारने यामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे प्रकल्पातील महत्त्वाच्या अशा या सेक्शनच काम BoT (Toll) मॉडेलवर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

याचा परिणाम म्हणून सरकारवर आर्थिक भार कमी होणार आहे आणि या प्रकल्पाला गती मिळेल अशी आशा आहे. या नव्या निर्णयामुळे या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला टोल वसुलीच्या आधारे गुंतवणूक परत मिळवता येणे शक्य होणार आहे.

नाशिक ते अक्कलकोट प्रवास फक्त चार तासात

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाशिक ते अक्कलकोट हा सुरत – चेन्नई ग्रीन फीड एक्सप्रेस वे चा महत्त्वाचा सेक्शन दोन भागात विभागण्यात आला आहे. नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट असे हे दोन विभाग आहेत.

यातील नाशिक ते अहिल्यानगर हे अंतर 152 किलोमीटर इतके राहणार असेल आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट हे अंतर 222 किलोमीटर इतके असेल. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा राज्यातील पाच जिल्ह्यांमधून जाईल.

या नव्या मार्गामुळे नाशिक ते अक्कलकोट हे अंतर अवघ्या 4 तासांत पार करता येणार असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. खरे तर सध्या नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना नऊ तासांचा वेळ लागतोय मात्र प्रस्तावित महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा वेळ पाच तासांनी कमी होणार आहे.

या नव्या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव अन पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या उत्तरेकडील टोकाची थेट जोडणी नवसारीजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे सोबत केली जाणार अशी ही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

परिणामी या महामार्गामुळे सुरत ते चेन्नईदरम्यानचा प्रवास वेगवान होण्यासोबतच संपूर्ण देशाच्या उत्तर-दक्षिण दळणवळणात मोठी क्रांती घडणार आहे. दरम्यान, आता लवकरच नाशिक ते अक्कलकोट दरम्यानच्या सेक्शनसाठी BoT मॉडेलवर नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!