महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘या’ 12 योजनेच्या माध्यमातून मिळणार 60 ते 90 टक्के अनुदान ! अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 22 कोटींचा निधी मंजूर

Published on -

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्र राज्य शासन आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजनांची घोषणा केली आहे. दरम्यान आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या काही महत्त्वाकांशी योजनांची माहिती जाणून घेणार आहोत.

खरेतर, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी असंख्य योजना सुरू केल्या आहेत. कृषी समृद्धी योजना पण अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल २२ कोटी २९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामुळे जिल्ह्यात आधुनिक शेती, पायाभूत सुविधा आणि हवामानानुकूल तंत्रज्ञानाला अधिक गती मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय. महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने २२ जुलै २०२५ रोजी ही योजना कार्यान्वित केली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वी मॉडेलवर योजनेची उभारणी करण्यात आली असून, जिल्ह्यात उत्पादन खर्च कमी करण्यापासून ते मूल्यसाखळी मजबूत करण्यापर्यंत अनेक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दरम्यान आता आपण कोणत्या योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळणारे या संदर्भातील माहिती पाहणार आहोत. 

शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या ह्या योजनेच्या माध्यमातून ६० ते ९० % पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीत वाढ करून नवी तंत्रे स्वीकारावीत यासाठी शासनाकडून विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते.

१२ विविध प्रकल्पांवर अनुदान देण्यात येत आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ६० टक्के, तर अनुसूचित जाती/जमातीतील शेतकऱ्यांना ९० टक्के इतके उदार अनुदान मिळणार आहे.

या बाबींसाठी मिळणार अनुदान 

  1. शेडनेट हाउस मध्ये मातीविरहित ब्ल्यूबेरी लागवड
  2. मातीविरहित हळद लागवड
  3. स्ट्रॉबेरी लागवड
  4. मध उत्पादन व प्रक्रिया केंद्र
  5. कांदाचाळ उभारणी
  6. केळी लागवड प्रकल्प
  7. शीतगृहाची उभारणी
  8. एकात्मिक पॅक हाऊस
  9. जीवामृत स्लरी युनिट
  10. ऑटोमॅटिक फर्टिगेशन आणि इरिगेशन युनिट
  11. भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया केंद्र
  12. ग्रेडिंग, वॅक्सिंग आणि पॅकिंग युनिट

अर्ज कसा करावा लागणार ?

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांना ही संधी गमावू नका, असे आवाहन केले आहे.

दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमुळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, नव्या पिकांचे प्रोत्साहन आणि शाश्वत शेतीची पायाभरणी अधिक बळकट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News