Maharashtra Farmer : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर 2025 या वर्षाची लवकरच सांगता होणार आहे आणि नव्या वर्षाला सुरुवात होईल.
दरम्यान या वर्षाची सांगता होण्याआधीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नव्या वर्षात शेतकऱ्यांना दुहेरी भेट मिळणार आहे. दोन मोठ्या योजनांचे पैसे 2026 च्या अगदी सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसानचा 21 वा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पीएम किसानचा 21 वा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसांनी नमो किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्याची शक्यता होती. मात्र असे काही झाले नाही आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. पण आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार अशी शक्यता आहे.
नमोचा हफ्ता कधी येणार?
मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात किंवा 1 जानेवारी 2026 रोजी राज्यातील पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचा पुढील आठवा हप्ता दिला जाऊ शकतो.
अद्याप याबाबत फडणवीस सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. शिवाय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे किंवा कृषी विभागाकडून या संदर्भात कोणत्याच अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाही.
पण मीडिया रिपोर्ट मध्ये या योजनेचा पुढील हप्ता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी माहिती दिली जात आहे. नक्कीच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर याचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 22 वा हप्ता वितरणा संदर्भात देखील महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
Pm Kisan चा 22 वा हफ्ता कधी?
मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान चा पुढील 22 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. खरे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी तामिळनाडूच्या कोयंबतूर येथून 21 वा हप्ता पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केला होता.
21व्या हप्त्यापोटी देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 18000 कोटी रुपयांचा निधी एकाच वेळी जमा झाला होता.
दरम्यान, आता पुन्हा एकदा फेब्रुवारी 2026 मध्ये पीएम किसानच्या नऊ कोटी लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे 18000 कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.