Maharashtra Favorite Tourist Spot : महाराष्ट्राला लाभलेलं नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत आहे. महाराष्ट्र एक्सप्लोर करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशी पर्यटक आपल्या मराठी मातीत पाऊल टाकतात. महाराष्ट्रात फिरण्यासारखी असंख्य डेस्टिनेशन आपल्याला पाहायला मिळतील.
यातील काही डेस्टिनेशन हे विशिष्ट कारणांनी प्रसिद्ध आहेत. राज्यातील असंच एक सुंदर डेस्टिनेशन आहे मोरांची चिंचोली. मोरांची चिंचोली हे गाव महाराष्ट्रातील असद बुधगाव आहे जिथे माणसांपेक्षा मोरांची संख्या जास्त आहे.

याला मोरांचे गाव म्हणून सुद्धा ओळखतात कारण येथे पावला पावलांवर तुम्हाला मोर पाहायला मिळतील. या गावाला पर्यटक खास मोर पाहण्यासाठी भेट देतात. येथील प्रत्येक घराच्या अंगणात, शेतात, जंगलात तुम्हाला मोर पाहायला मिळतील.
यामुळे येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. जर तुम्हीही पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी मोराची चिंचोली हे एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकते.
जर तुम्हाला या गावाला भेट द्यायचे असेल तर तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट द्यायला हवी. कारण असे की मोरांचा आवडता ऋतू पावसाळा आणि हिवाळाच आहे. यामुळे या कालावधीत या गावाला भेट दिली तर तुम्हाला असंख्य मोर पाहायला मिळतील.
जून ते डिसेंबर हा काळ या गावाला भेट देण्यासाठी सर्वात अनुकूल असतो. या गावाचे नैसर्गिक सौंदर्य देखील खूपच अप्रतिम आहे. हे गाव रांजणगाव गणपती पासून अवघ्या 23 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
रांजणगाव गणपती हे अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. यामुळे रांजणगाव गणपतीला येणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय असून यापैकी बहुतांशी लोक चिंचोली गावाला भेट देतात.
पुणे नगर रस्त्यावर शिरूर शिक्रापूर जवळ मोरांची चिंचोली हे गाव स्थित आहे. या गावाचे नाव फक्त चिंचोली असेच आहे मात्र येथे मोरांची संख्या इतके प्रचंड आहे की या गावाला आता मोराची चिंचोली असे म्हणूनच ओळखले जाते.
दरम्यान जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात रांजणगाव गणपतीला दर्शनासाठी जाणार असाल तर तुम्ही मोरांची चिंचोली हे गाव नक्कीच एक्सप्लोर करायला हवे.
या ठिकाणी केल्यास तुम्हाला लहान मोठे मोर पाहायला मिळतील आणि ज्यामुळे तुमची पिकनिक चांगलीच मनोरंजक होणार आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासमवेत तसेच मित्रांसमवेत भेट देऊ शकता.