Maharashtra Government Employee : 2022 चा वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं फायदेशीर ठरल आहे. कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्र शासनाकडून अनुज्ञय झाला आहे. खरं पाहता सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.
जानेवारी महिन्यात पहिल्यांदा आणि जुलै महिन्यात दुसऱ्यांदा अशा पद्धतीने डीए वाढ दिली जाते. या अनुषंगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असून नवीन वर्षात जानेवारी महिन्यापासून त्यांच्या महागाई भत्त्यात अजून वाढ केली जाणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून जानेवारी महिन्यापासून त्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही 34 टक्के दरानेच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत आहे.
गेल्यावर्षी राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभही मिळाला नाही आणि जुनी पेन्शन योजना अर्थातच ओ पी एस योजना देखील लागू झाली नाही. खरं पाहता डिसेंबर 2022 मध्ये उपराजधानी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन झाले होते. या गेल्या हिवाळी अधिवेशनात ओपीएस योजनेबाबत शासन काहीतरी सकारात्मक असा निर्णय घेईल निदान यावर सकारात्मक अशी चर्चा होईल अशी आशा राज्य कर्मचाऱ्यांना होती.
मात्र तसं काही झालं नाही याउलट राज्य शासनाने ओपीएस योजना राज्य कर्मचाऱ्यांना कदापी लागू होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. यामुळे 2022 हे वर्ष राज्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष असं लाभप्रद सिद्ध झालं नाही. दरम्यान आत्ता लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचे चित्र आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 38 टक्के दराने DA वाढीचा लाभ अनुज्ञय होणार आहे.
अर्थातच ज्यावेळी राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल त्यावेळी जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीची जी फरकाची रक्कम आहे म्हणजे जी थकबाकी आहे ती देखील मिळणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 34% दराने महागाई भत्ता दिला जात आहे आता यामध्ये चार टक्के वाढ दिली जाणार आहे.
यासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद झाली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे निश्चितच नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट राज्य शासनाकडून मिळणार आहे.