महाराष्ट्रातील ‘या’ हजारो कर्मचाऱ्यांना अखेर बोनस मिळाला, खात्यात जमा झालेत 29 हजार, कोणाला लाभ मिळाला? वाचा….

गेल्या वर्षी अर्थातच 2023 च्या दिवाळीमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांना फक्त 20000 चा बोनस मिळाला होता. यंदा मात्र या बोनसच्या रकमेत 9000 ची वाढ झाली असून संबंधित कर्मचाऱ्यांना तब्बल 29 हजार रुपये बोनस म्हणून देण्यात आले आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Government Employee News

Maharashtra Government Employee News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता पाच दिवस झालेत. यात महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसात राज्यात आता नवीन येणार आहे. आज महायुतीमधील ज्येष्ठ नेते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल आणि मंत्रिमंडळात कोणकोणत्या आमदारांचा समावेश राहणार हे सारे आज क्लियर होणार आहे. दरम्यान अशा या परिस्थितीतच महाराष्ट्रातील बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीच्या काळात बोनस मिळू शकला नाही. पण आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उठली असल्याने बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

बेस्टच्या 27000 कर्मचाऱ्यांचा रखललेला बोनस आता या संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 29000 चा बोनस बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या वर्षी अर्थातच 2023 च्या दिवाळीमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांना फक्त 20000 चा बोनस मिळाला होता. यंदा मात्र या बोनसच्या रकमेत 9000 ची वाढ झाली असून संबंधित कर्मचाऱ्यांना तब्बल 29 हजार रुपये बोनस म्हणून देण्यात आले आहे.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 80 कोटी रुपयांच्या वाटपानंतर प्रत्येकी 29,000 रुपयांचा दिवाळी बोनस दिला आहे. 3 नोव्हेंबर रोजी मुंबईतील प्रमुख डेपोमध्ये ही घोषणा करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसीने कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 80 कोटी रुपये दिले आहेत. याचं रकमेतून आता या संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झाली आहे. या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना 29,000 रुपयांचा बोनस देण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या 20,000 रुपयांच्या तुलनेत या वर्षी बोनस वाढला आहे. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले असून महानगरपालिकेच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

दिवाळीच्या काळात या संबंधित कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळाले नाही यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी आर्थिक अडचणीची ठरली. पण आता दिवाळीनंतर या कर्मचाऱ्यांना बोनस मिळालाय आणि यामुळे नक्कीच या सदर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe