काय फरक असतो नेमका 24 कॅरेट, 22 आणि 18 कॅरेट सोन्यामध्ये? कोणत्या कॅरेटमध्ये कोणते धातू केलेले असतात मिक्स? जाणून घ्या माहिती

24 कॅरेट ऐवजी सोन्यामध्ये 22 कॅरेटचे आणि 18 कॅरेटचे सोने देखील येते. परंतु जर आपण कॅरेट नुसार सोन्याची शुद्धता बघितली तर यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. परंतु कित्येक जणांना या वेगवेगळ्या कॅरेटमधील फरक माहिती नसतो. त्यामध्ये सोन्याची शुद्धता किंवा कॅरेटनुसार इतर धातूंचा वापर केलेला असतो

Ajay Patil
Published:
gold

Difference Between carat Of Gold:- सोन्याची खरेदी ही भारतामध्ये पूर्वापार केली जाते व भारतीयांमध्ये सोन्याच्या खरेदीला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. त्यातले त्यात लग्नसराईचा कालावधी असेल किंवा सणासुदीच्या कालावधी असेल तर सोन्याच्या खरेदीत प्रचंड प्रमाणात वाढ होते.

तसेच आता गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील सोन्याच्या खरेदीकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु जेव्हा आपण सोने खरेदी करायला जातो तेव्हा प्रामुख्याने आपण 24 कॅरेट सोन्याची खरेदी किंवा 24 कॅरेटचे सोने हे शुद्ध असते असे म्हणतो व 24 कॅरेट सोन्याचा खरेदीलाच प्राधान्य दिले जाते.

तसेच 24 कॅरेट ऐवजी सोन्यामध्ये 22 कॅरेटचे आणि 18 कॅरेटचे सोने देखील येते. परंतु जर आपण कॅरेट नुसार सोन्याची शुद्धता बघितली तर यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. परंतु कित्येक जणांना या वेगवेगळ्या कॅरेटमधील फरक माहिती नसतो.

त्यामध्ये सोन्याची शुद्धता किंवा कॅरेटनुसार इतर धातूंचा वापर केलेला असतो व त्यानुसार ही कॅरेटची श्रेणी ठरवली जात असते. त्यामुळे या लेखात आपण या वेगवेगळ्या कॅरेट सोन्यामध्ये असलेला फरक अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत.

कॅरेटनुसार सोन्यामध्ये काय असतो फरक?

1- 24 कॅरेट सोने- 24 कॅरेट सोन्याची शुद्धता बघितली तर ती 99.99% इतकी असते. म्हणजेच 24 कॅरेट सोने हे शुद्ध सोने समजले जाते व या सोन्यामध्ये इतर धातूंचा समावेश केलेला नसतो. त्यामुळे इतर कॅरेट असलेल्या सोन्यापेक्षा हे सोने महाग असते.

24 कॅरेट सोन्यापासून प्रामुख्याने दागिने बनवले जात नाही हे तितकेच खरे आहे. परंतु 24 कॅरेट सोन्यापासून सोन्याची शिक्के तसेच बिस्किट मात्र तयार केले जातात. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि औषधांमध्ये देखील याचा वापर करण्यात येतो.

2- 22 कॅरेट सोने- 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेमध्ये जर आपण 22 कॅरेट सोन्याची शुद्धता बघितली तर हे सोने 91.67% शुद्ध असते. म्हणजेच यामध्ये इतर धातूंची 8.33% इतके मिश्रण असते. इतर धातूंमध्ये या सोन्यात प्रामुख्याने तांबे व चांदीचा वापर केलेला असतो.

22 कॅरेट सोने देखील शुद्ध मानण्यात येते व सोन्याचे दागिने तसेच आभूषणे तयार करण्याकरिता प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. 22 कॅरेट सोन्यापासून बनवलेली दागिने हे वजनाने हलके असतात व लवचिक म्हणजेच नरम देखील असतात.

3- 18 कॅरेट सोने- 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या तुलनेत जर आपण 18 कॅरेट सोन्याची शुद्धता बघितली तर ती 75 टक्के इतकी आहे व उर्वरित 25 टक्क्यांमध्ये चांदी आणि तांब्याचा वापर केलेला असतो. 18 कॅरेट सोन्यामध्ये इतर धातूंचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेल्याने हे सोने थोडे कठोर म्हणजेच कठीण असते.

18 कॅरेट सोन्याचा वापर हा दागिने तसेच अंगठी व गळ्यातील चैन इत्यादी रोजच्या वापरासाठी उपयोगी पडणाऱ्या दागिन्यांसाठी करतात. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे रोजच्या वापरासाठी जे सोन्याचे दागिने तयार होतात ते 18 कॅरेट सोन्याचे असतात.

4- 14 कॅरेट सोने- 14 कॅरेट सोन्यामध्ये इतर धातूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते व हे सोने साधारणपणे 58.3% इतके शुद्ध असते व त्यामध्ये 41.7% इतर धातूंचे मिश्रण केलेले असते. इतर धातूंमध्ये निकेल, चांदी तसेच जस्त यांचा वापर केलेला असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe