‘या’ राज्य सरकारी कर्मचारी अन अधिकाऱ्यांच्या महागाई भत्ता, प्रवास भत्यात मोठी वाढ !

Published on -

Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता प्रवास भत्ता व इतर काही भत्ते वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

खरे तर विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा विविध सार्वत्रिक निवडणूकीसाठी किंवा पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची तसेच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. दरम्यान याच नियुक्त अधिकाऱ्यांच्या संदर्भात सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लोकसभा, विधानसभा तसेच सार्वत्रिक / पोट निवडणुक कामकाज करीता नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले विविध आर्थिक लाभ वाढवण्यात आले आहेत.

या कर्मचाऱ्यांना लागू असणारे परिश्रमिक मानधन, अतिकालिक भत्ता तसेच आहार भत्ता तसेच टी.ए / डी.ए मध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान आता आपण कोण कोणत्या कर्मचाऱ्यांना या वाढीव भत्त्याचा लाभ मिळणार बाबत माहिती पाहणार आहोत.

आहार भत्ता वाढला 

निवडणूक कालावधीत मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी तसेचं कर्मचारी आणि पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी यांना लागू असणारा आहार भत्ता वाढवण्यात आला आहे.

शिवाय निवडणुकीत कार्यरत असणारे मोबाईल पथके, होमगार्ड, वनरक्षक दल, ग्रामरक्षक दल, NCC कॅडेटस, माजी सैनिक, स्वयंसेवक यांचा पण आहार भत्ता वाढवण्यात आला आहे. आधी या कर्मचाऱ्यांना 150 रुपये प्रति दिवस या प्रमाणे आहार भत्ता मिळत होता आता तो पाचशे रुपये करण्यात आला आहे.

महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता किती मिळणार

राज्यात निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना 100% प्रवास भत्ता तसेच दैनिक भत्ता दिला जाणार आहे. 

निवडणुक भत्ता किती मिळणार?

क्षत्रिय दंडाधिकारी यांना संपूर्ण निवडणुकीत एकदा पंधराशे रुपयांचा भत्ता मिळणार आहे. 

मतदान केंद्राध्यक्ष / मतमोजणी पर्यवेक्षक यांना आधी 350 रुपये प्रति दिवस असा निवडणूक भत्ता मिळत होता तो पाचशे रुपये प्रति दिवस किंवा एकदाच 2 हजार रुपये असा करण्यात आला आहे. 

मतदान अधिकारी यांना आधी 250 रुपये प्रति दिवस असा निवडणूक भत्ता दिला जायचा जो 400 रुपये प्रति दिवस किंवा संपूर्ण निवडणुकीसाठी सोळाशे रुपये असा करण्यात आला आहे.

मतमोजणी सहायक यांना आधी 250 रुपये प्रति दिवस असा निवडणूक भत्ता दिला जायचा जो आता 450 रुपये प्रति दिवस किंवा संपूर्ण निवडणुकीसाठी 1350 रुपये असा करण्यात आला आहे.

 चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना आधी दोनशे रुपये प्रति दिवस असा निवडणूक भत्ता दिला जायचा जो आता 350 रुपये प्रति दिवस किंवा एकत्रित चौदाशे रुपये असा करण्यात आला आहे.

फिरत्या पथकातील वर्ग 1 आणि 2 च्या कर्मचाऱ्यांना आधी एकदा बाराशे रुपयांचा लाभ मिळायचा पण आता तो तीन हजार रुपये करण्यात आला आहे. यातील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना आधी एक हजार रुपयांचा भत्ता मिळायचा जो की दोन हजार रुपये करण्यात आला आहे. 

आयकर निरीक्षक यांना बाराशे रुपयांचा भत्ता मिळायचा आता तो 3000 रुपये करण्यात आला आहे.

सूक्ष्म निरीक्षक यांना आधी एक हजार रुपये भत्ता मिळायचा आता दोन हजार रुपये करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe