महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा ! 2025 मध्ये….

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी देखील सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही एक अतिरिक्त सुट्टी राहणार असून शासनाच्या या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. 2025 मध्ये 23 ऑक्टोबरला भाऊबीज राहणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना याच दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.

Tejas B Shelar
Published:

Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे राज्यातील फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी देखील सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही एक अतिरिक्त सुट्टी राहणार असून शासनाच्या या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

2025 मध्ये 23 ऑक्टोबरला भाऊबीज राहणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना याच दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षात 24 सुट्ट्या दिल्या जातात. दरम्यान 2025 मध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची यादी नुकत्याच काही दिवसांपूर्वी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती.

याबाबतचे सविस्तर शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झाले. यानंतर शासनाने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक सुट्टी वाढवून दिली जाईल असे म्हटले आहे. याबाबतचे ही शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे. म्हणजेच 2025 मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 25 सुट्ट्या मिळणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेचा महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून हीच गोष्ट विचारात घेऊन फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी देण्याचा एक मोठा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. दरम्यान आता आपण नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या तारखांना सुट्टी राहणार आणि सुट्टीचे कारण काय या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

जानेवारी ते मार्च 2025 मधील सुट्ट्या

प्रजासत्ताक दिन- २६ जानेवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती- १९ फेब्रुवारी २०२५
महाशिवरात्री-२६ फेब्रुवारी
होळी-१४ मार्च
गुढीपाडवा-३० मार्च २०२५
रमझान ईद-३१ मार्च २०२५
एप्रिल ते जून 2025 मधील सुट्ट्या
रामनवमी- ६ एप्रिल २०२४
महावीर जन्म कल्याणक-१० एप्रिल २०१५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंची- १४ एप्रिल २०२५
गुड फ्रायडे-१८ एप्रिल २०२५
महाराष्ट्र दिन- १ मे २०२५
बुद्ध पोर्णिमा-१२ मे २०२५
बकरी ईद- ७ जून २०२५
जुलै ते सप्टेंबर 2025 मधील सुट्ट्या
मोहरम- ६ जुलै २०२५
स्वातंत्र्य दिन-१५ ऑगस्ट २०२५
पारशी नववर्षी- १५ ऑगस्ट २०२५
गणेश चतुर्थी-२७ ऑगस्ट २०२५
ईद-ए-मिलाद- ५ सप्टेंबर २०२५
ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मधील सुट्ट्या
महात्मा गांधी जयंती- २ ऑक्टेबर २०२५
दसरा -२ ऑक्टोबर
दिवाळी अमावस्या-२१ ऑक्टोबर
दिवाळी- २२ ऑक्टोबर
भाऊबीज – 23 ऑक्टोबर 2025
गुरुनानक जयंती-५ नोव्हेंबर २०२५
ख्रिसमस- २५ डिसेंबर २०२५

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe